मैदानाला मोदींचं नाव, हम दो हमारे दो म्हणत राहुल गांधींची टीका
जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडीयम अशी ओळख असलेल्या गुजरातच्या क्रिकेट मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते मैदानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान अहमदाबादमध्ये तयार व्हावं ही कल्पना […]
ADVERTISEMENT
जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडीयम अशी ओळख असलेल्या गुजरातच्या क्रिकेट मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते मैदानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान अहमदाबादमध्ये तयार व्हावं ही कल्पना पहिल्यांदा सुचली होती. परंतू सरदार पटेलांचं नाव डावलून मोदींचं नाव मैदानाला देण्यावरुन राजकारणात नवीन वादाला सुरुवात झाली.
ADVERTISEMENT
मैदानाला मोदींचं नाव देऊन मोदी सरकार सरदार पटेल यांचा अपमान करत असल्याचं मत विरोधीपक्षातील काँग्रेसने व्यक्त केलं. काँग्रेसचे गुजरातमधील नेते हार्दिक पटेल यांनी ट्विट करत आपली नाराजी बोलून दाखवली.
दुनिया के सबसे बड़े अहमदाबाद स्थित सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम का नाम बदलकर नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम रखा गया है, क्या यह सरदार पटेल का अपमान नहीं हैं ? सरदार पटेल के नाम पर मत माँगने वाली भाजपा अब सरदार साहब का अपमान कर रही हैं। गुजरात की जनता सरदार पटेल का अपमान नहीं सहेगी।
— Hardik Patel (@HardikPatel_) February 24, 2021
भारत रत्न, लोह पुरुष सरदार पटेल ने आरएसएस पर प्रतिबंध लगाया था और उसी कारण आरएसएस के चेले सरदार पटेल का नाम मिटाने का हर संभव प्रयास कर हैं। बाहर से मित्रता पर भीतर से बैर, यह व्यवहार भाजपा का सरदार पटेल से हैं। एक बात याद रखिएगा की सरदार पटेल का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। ?
— Hardik Patel (@HardikPatel_) February 24, 2021
राहुल गांधी यांनीही ट्विट करत मैदानाला नरेंद्र मोदींचं नाव देण्यावरुन केंद्र सरकारला उपहासात्मक टोला लगावला.
हे वाचलं का?
सच कितनी खूबी से सामने आता है।
नरेंद्र मोदी स्टेडियम
– अडानी एंड
– रिलायंस एंडजय शाह की अध्यक्षता में!#HumDoHumareDo
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 24, 2021
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रसेच आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमधले कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मैदानाला मोदींचं नाव देण्यावरुन टीका केली आहे.
स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले…
हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 24, 2021
याव्यतिरीक्त सोशल मीडियावरही दिवसभर मैदानाला मोदींचं नाव देण्यावरुन मोदी समर्थक विरुद्ध मोदी विरोधकांमध्ये सामना रंगलेला पहायला मिळाला. दरम्यान टीम इंडियाने पहिल्या दिवसाच्या खेळावर आपलं वर्चस्व गाजवलं. इंग्लंडची पहिली इनिंग ११२ रन्सवर संपवत टीम इंडियाच्या बॉलर्सनी इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. अक्षर पटेलने ६ विकेट्स घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं.
ADVERTISEMENT
अवश्य वाचा – योगायोग! 100 वी टेस्ट खेळणाऱ्या इशांतची कपिल देव यांच्याशी बरोबरी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT