Tokyo Olympics गाजवणाऱ्या भारतीय खेळाडूंनी घेतली नरेंद्र मोदींची भेट
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतीच भेट घेतली. एका विशेष सत्कार सोहळ्यात पंतप्रधानांनी या सर्व खेळाडूंशी संवाद साधत त्यांचं कौतुक केलं. यावेळी खेळाडूंनीही ही भेट संस्मरणीय ठरण्यासाठी आपल्या खास वस्तू पंतप्रधानांना दिल्या. बॉक्सिंगमध्ये कांस्यपदकाची कमाई करणारी लोवलिना बोर्गोहेन पंतप्रधानांना आपले ग्लोव्हज देताना… रिओ ऑलिम्पिकपाठोपाठ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही पदकाची कमाई करणाऱ्या […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतीच भेट घेतली. एका विशेष सत्कार सोहळ्यात पंतप्रधानांनी या सर्व खेळाडूंशी संवाद साधत त्यांचं कौतुक केलं.
हे वाचलं का?
यावेळी खेळाडूंनीही ही भेट संस्मरणीय ठरण्यासाठी आपल्या खास वस्तू पंतप्रधानांना दिल्या. बॉक्सिंगमध्ये कांस्यपदकाची कमाई करणारी लोवलिना बोर्गोहेन पंतप्रधानांना आपले ग्लोव्हज देताना…
ADVERTISEMENT
रिओ ऑलिम्पिकपाठोपाठ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही पदकाची कमाई करणाऱ्या सिंधूचं मोदींनी कौतुक केलं. यावेळी मोदींनी सिंधूची त्यांच्यासोबत आईस्क्रीम खाण्याची इच्छाही पूर्ण केली.
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच दिवशी भारताला वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदकाची कमाई करुन देणारी मीराबाई चानू मोदींसमवेत
कुस्तीपटू बजरंग पुनियाकडून यंदा भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा होती…परंतू त्याला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. पंतप्रधान मोदींनी बजरंगला धीर देत त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
पहिल्याच प्रयत्नात ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या रवी कुमारचंही मोदींनी कौतुक केलं.
४१ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हॉकीत पदक मिळवणारा भारताचा हॉकीसंघ आणि प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी
अखेरच्या दिवशी नीरज चोप्राने भालाफेकीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. ज्या भाल्याने नीरजने टोकियोत इतिहास घडवला, त्या भाल्याचं अगदी बारकाईने निरीक्षण करताना पंतप्रधान मोदी.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT