IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादची हाराकिरी सुरुच; राजस्थानचा 55 रन्सने विजय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्या लढतीत राजस्थानचा अखेर विजय झाला आहे. राजस्थानने हैदराबादला 221 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. मात्र केन विल्यमसनच्या सनरायझर्सला केवळ 165 धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादचा 55 धावांनी पराभव करत राजस्थानने स्पर्धेतील तिसरा सामना जिंकला आहेत.

ADVERTISEMENT

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकत राजस्थानला प्रथम फलंदाजी दिली. राजस्थान रॉयल्सचा ओपनर जॉस बटलरने उत्तम खेळी करत शतकं झळकावलं. बटलर आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनीही डावाची सुरुवात केली. मात्र यशस्वी केवळ 12 रन्स करत माघारी परतला. त्यानंतर संजू सॅमसन आणि बटलरने तुफान खेळी केली. यावेळी संजू सॅमसन 48 रन्सवर आऊट झाला.

हे वाचलं का?

तर 221 धावांचं आव्हान स्विकारताना हैदराबादनेही दमदार सुरुवात केली. मनीष पांडे आणि जॉनी बेयस्ट्रोने पहिल्या विकेटसाठी 57 रन्स केले. मात्र मुस्तफिजुर रहमानने 31 रन्सवर मनीष पांडेची विकेट काढत हैदराबादला पहिला धक्का दिला. त्यानंतर राहुल तेवतियाने बेयस्ट्रोला 30 रन्सवर बाद करत महत्त्वाची विकेट काढली. कर्णधार केन विल्यमसन, केदार जाधव, विजय शंकर, अब्दुल समद यांना मोठी खेळी करता आली नाही. अखेर 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावत हैदराबादचा डाव 165 रन्सवर संपुष्टात आला.

ADVERTISEMENT

हैदराबादच्या आय़पीएलच्या यंदाच्या सीझनमधील हा सहावा पराभव होता. तर राजस्थानने त्यांचा तिसरा विजय नोंदवला आहे. राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जॉस बटलरने आयपीएलमधील पहिले शतक ठोकलं. यानंतर त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही देण्यात आला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT