Ranji Trophy Final : मुंबईने 42 व्यांदा जिंकली रणजी ट्राँफ्री, विदर्भाचं हँट्ट्रीकचं स्वप्न भंगलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ranji trophy final mumbai wins 42nd ranji trophy title vidarbha defeat akshay wadkar ajinjya rahane
वानखेडे स्टेडिअममध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला.
social share
google news

Ranji trophy final, Mumbai vs  Vidarbha :  मुंबई संघाने विदर्भाच्या संघाचा पराभव करत  रणजी ट्रॉफी जिंकली आहे.  वानखेडे स्टेडिअममध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने  विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला. त्यामुळे तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे विदर्भाचे स्वप्न भंगले. तर मुंबईने तब्बल 8 वर्षांनंतर रणजी करंडक जिंकला आहे. यासह 42 व्यांदा रणजी करंडक जिंकण्याचा विक्रम देखील मुंबईने केला आहे.  (ranji trophy final mumbai wins 42nd ranji trophy title vidarbha defeat akshay wadkar ajinjya rahane) 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : मुनगंटीवारांची सर्वात मोठी परीक्षा, अहिर करणार गेम?

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रणजी ट्रॉफीचा फायनल सामना खेळवला गेला होता. या सामन्यात मुंबईने विदर्भासमोर  538 धावांचा लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाला दुसऱ्या डावात केवळ 418 धावा करता आल्या. त्यामुळे मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला. त्यामुळे मुंबईने तब्बल 8 वर्षांनंतर रणजी करंडक जिंकला. याआधी 2015-16 च्या मोसमात सौराष्ट्रला पराभूत करून मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली होती. दरम्यान या विजयासह मुंबई संघाने 42 व्यांदा रणजी करंडक जिंकण्याचा विक्रम देखील केला आहे. त्यामुळे आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाच्या कामगिरीचे कौतुक होतं आहे.

हे ही वाचा : 'पवारांचा फोटो वापरू नका', अजितदादांना कोर्टाचा दणका!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT