BJP: सुधीर मुनगंटीवारांची आजवरची सर्वात मोठी परीक्षा, हंसराज अहिर करणार ऐनवेळी गेम?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

सुधीर मुनगंटीवारांना कोणाचं आव्हान?
सुधीर मुनगंटीवारांना कोणाचं आव्हान?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुधीर मुनगंटीवार लढवणार लोकसभा निवडणूक

point

चंद्रपूरमधून भाजपने दिलं तिकीट

point

हंसराज अहिर मुनगंटीवारांना पडणार भारी?

Sudhir Mungantiwar vs Hansaraj Ahir Chandrapur Lok Sabha 2024: चंद्रपूर: लोकसभा 2019 निवडणुकीत चंद्रपूरमध्ये भाजपला मानहारिकारक पराभव स्वीकारावा लागला होता. तब्बल चार वेळा निवडून आलेले खासदार आणि पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृह राज्यमंत्री असलेल्या हंसराज अहिर यांचा बाळू धानोरकरांनी पराभव केला होता. अहिरांच्या या पराभवामागे त्यांच्याच पक्षातील नेते सुधीर मुनगंटीवार यांचा हात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. असं असताना आता भाजपने लोकसभा निवडणूक 2024 साठी अहिर यांचा पत्ता कापून मुनगंटीवार यांनाच लोकसभेचं तिकीट दिलं आहे. (lok sabha election 2024 bjp leader sudhir mungantiwar biggest test ever hansraj ahir will take revenge at a strategic moment chandrapur constituency)

ADVERTISEMENT

चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवारांना उमेदवारी, हंसराज अहिर आता काय करणार?

2019 साली चंद्रपुरात भाजपचा झालेला पराभव हा धक्कादायक होता. कारण केंद्रीय गृहराज्यमंत्र्याचा तो पराभव होता. शिवसेनेचे आमदार असलेले बाळू धानोरकर हे लोकसभेसाठी आग्रही होते. मात्र, त्यावेळी शिवसेना-भाजप युती असल्याने शिवसेनेने तो मतदारसंघ भाजपसाठी सोडला होता. त्यामुळेच नाराज झालेल्या धानोरकरांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. एवढंच नव्हे तर त्यांनी लोकसभेची उमेदवारी देखील मिळवली आणि हंसराज अहिर यांना पराभूत देखील केलेलं. 

धानोरकर यांनी 5 लाख 59 हजार मतं मिळाली होती. तर अहिर यांना 5 लाख 14 हजार मतं मिळाली होती. हंसराज अहिर ज्या चंद्रपूर मतदारसंघातून निवडून येत होते तो खरं तर यवतमाळ आणि चंद्रपूर अशा दोन जिल्ह्यात पसरलेला आहे. चंद्रपूरमधील 4 आणि यवतमाळचे 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येतात.

हे वाचलं का?

यवतमाळमधील दोन्ही मतदारसंघात अहिर यांना चांगलं मताधिक्य होतं. पण चंद्रपूरमध्ये मात्र, त्यांना अपेक्षित मतदान झालं नाही. यावेळी सुधीर मुनगंटीवार हे ज्या बल्लारपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून जातात त्या मतदारसंघात देखील हंसराज अहिर हे पिछाडीवर होते. 

त्यावेळी अशीही चर्चा होती की, अहिर यांच्या पराभवामागे सुधीर मुनगंटीवार यांचा हात होता. कारण या दोन्ही नेत्यांचे एकमेकांशी फारसे चांगले संबंध नव्हते. त्यातूनच जिल्ह्यातील वचर्स्वाचा मुद्दा देखील दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने तेढ निर्माण करत होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'शरद पवारांचा फोटो वापरू नका', अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका!

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात भाजपने प्रचंड मोठं यश मिळवलं होतं. मात्र, तरीही गृह राज्यमंत्री अहिरांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ज्यानंतर त्यांनी आपल्या पराभवाबाबत अनेकदा जाहीर कार्यक्रमांमधून सवाल उपस्थित केले होते. ज्याचा रोख हा थेट सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेच होता. 

ADVERTISEMENT

अहिर यांच्या लोकसभेतील पराभवानंतर भाजपने त्यांना केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचं अध्यक्षपद देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचाही प्रयत्न केला. पण असं असलं तरी अहिर हे 2024 च्या लोकसभेसाठी इच्छुक होते. पण त्याच वेळी केंद्रीय नेतृत्वाने सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देऊन अहिर यांचे तिकीट कापले. 

सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्यातील राजकीय वैर हे सर्वश्रृत आहे. हंसराज अहिर थेट मुनगंटीवारांचं नाव घेत आरोप केलेले नसले तरी त्यांचा रोख हा त्याच्यावरच असतो. तर दुसरीकडे मुनगंटीवार हे अहिरांना मदत न केल्याचा आरोप हा सातत्याने फेटाळत आले आहेत. 

खरं तर वचर्स्वाच्या वादातून जी स्पर्धा सुरू झाली होती. त्यात हसंराज अहिरांच्या पराभवाने सुरुवातीला मुनगंटीवारांनी सरशी साधली होती. पण आता त्याच मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यासाठी हंसराज अहिर यांना बाजूला सारण्यात आलं आहे. 

यामुळे हसंराज अहिर हे दुहेरी पद्धतीने दुखावले गेले आहेत. पहिल्यांदा 2019 मधील पराभव आणि दुसऱ्यांदा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुनगंटीवारांनाच लोकसभेचं तिकीट.. त्यामुळे आता पुढचा डाव हा हंसराज अहिर यांचा असणार आहे आणि ते त्यांच्या पराभवाचं उट्टं नेमकं कसं काढणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा>> भाजपची महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची संपूर्ण यादी

सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात त्यांचं राजकारण केलं आहे. मात्र, देवेंद्र फडणवीसांच्या उदयानंतर त्यांना काहीसं बाजूला सारलं गेलं. मात्र, तरीही त्यांनी कोणतीही आक्रमक भूमिका न घेता राज्यातील नेतृत्वाशी जुळवून घेतलं. मात्र, आता मुनगंटीवारांना थेट दिल्लीत पाठवून देण्याची राजकीय खेळी खेळण्यात आली आहे. 

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार हे दिल्लीत जाण्यास फारसे उत्सुक नाहीत. त्याबाबत त्यांनी जाहीर विधानंही केलं आहे. असं असतानाही पक्षाने त्यांना त्याच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे जिथे मोदी लाटेतही भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता. 

एकीकडे, स्वत:चं राजकीय महत्त्वाचं टिकविण्याचं आव्हान आणि दुसरीकडे हंसराज अहिर यांच्यासारखा पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असं दुहेरी आव्हान हे आता सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर आहे. त्यामुध्ये मुनगंटीवार किती यशस्वी होतात यावर त्यांचं पुढील राजकारण हे अवलंबून असणार आहे.  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT