धक्कादायक! पैशांच्या लोभापायी पत्नीची आबरू लुटली; 1000 रुपये घेऊन मित्रांकडून बलात्कार घडवून आणला अन्...
पैशाच्या लोभापोटी एका पतीने तिच्या पत्नीवर दोन पुरुषांकडून बलात्कार घडवून आणल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पैशांच्या लोभापायी पत्नीची आबरू लुटली
1000 रुपये घेऊन मित्रांकडून बलात्कार घडवून आणला अन्...
Crime News: पैशाच्या लोभापोटी एका पतीने तिच्या पत्नीवर दोन पुरुषांकडून बलात्कार घडवून आणल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारीच्या सकाळी ही महिला आपल्या पतीसोबत कामानिमित्त घराबाहेर निघाली होती. वाटेत पप्पू आणि बालकिशन नावाचे पतीचे दोन मित्र त्यांना भेटले. पतीने या दोघांशी केवळ 1000 रुपयांत आपल्या पत्नीचा सौदा केला. त्यानंतर पतीने पत्नीला खोटं सांगितले की, "मला काही काम आहे, तू या दोघांसोबत बाईकवर बसून गॅस एजन्सीकडे जा." त्यावेळी, पतीवर विश्वास ठेवून ती तिच्या कामासाठी पतीच्या दोन मित्रांसोबत गेली.
जंगलात पीडितेसोबत घृणास्पद कृत्य
दुपारी सुमारे 1 वाजता दोघांनी तिला जवळच्या जंगलात नेलं आणि तिथे लिप्टसच्या झाडांच्या कापलेल्या बागेत दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. कसंबसं ती तिथून पळून तिच्या घरापर्यंत पोहोचली. तेव्हा तिने तिच्या पतीला "माझ्यासोबत धोका का केला?" असं विचारलं. त्यावर पती म्हणाला की, "मी तुझा वापर करून पैसे कमावणार आहे."
हे ही वाचा: Govt Job: राज्यात लवकरच नव्या मॉडेलअंतर्गत तब्बल 70,000 पदांची मेगाभरती! बैठकीत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...
दिरासोबत केली तक्रार दाखल
पीडितेने ही सगळी बाब तिच्या दिराला सांगितली आणि दुसऱ्या दिवशी पीडित महिला तिच्या दिरासोबत पोलीस ठाण्यात पोहोचली. त्यावेळी, तिने पोलिसांकडे न्यायाची मागणी करत आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: लॉ कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार! वर्गात गोळी झाडून तरुणीची हत्या अन् जागीच तरुणाची आत्महत्या... CCTV मध्ये कैद
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी तातडीने या प्रकरणासंबंधी एफआयआर नोंदवली आणि महिलेची मेडिकल तपासणी केली. दरम्यान, या पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, प्रकरणाची माहिती मिळताच आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेवटी, 9 फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपी (पप्पू आणि बालकिशन) यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केलं गेलं. पतीच्या षड्यंत्रातील भूमिकेची तपासणी सुरू आहे. तसेच, आपल्या पतीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी पीडितेने पोलिसांकडे मागणी केली आहे.










