सावत्र वडिलांकडून 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, सीसीटीव्ही तपासातून झाला खुलासा

मुंबई तक

Crime News : सावत्र वडिलांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी पोलिसांनी रविवारी अटकेची घोषणा केल्याचं वृत्त आहे. आरोपीचं वय वर्षे 32 असून पीडित मुलीचं वय हे 13 आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सावत्र वडिलांकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

point

सीसीटीव्ही तपासातून झालं उघड

Crime News : सावत्र वडिलांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी पोलिसांनी रविवारी अटकेची घोषणा केल्याचं वृत्त आहे. आरोपीचं वय वर्षे 32 असून पीडित मुलीचं वय हे 13 आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस आरोपीकडून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

हे ही वाचा : रेवती सुळे यांचं लग्न ठरलं, सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई कोण? 

सीसीटीव्ही तपासातून झालं उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या आईने शुक्रवारी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात तक्रारदाराने तिची मुलगी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता कोणाला कसलीही माहिती न देता दूर निघून गेली. संबंधित प्रकरणात तक्रारीवर कारवाई करताना पोलिसांनी सांगितलं की, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले होते. त्यामध्ये पीडित मुलगी ही घर सोडून शहरातील बीईएल रोड परिसरातील तिच्या आजीच्या घरी गेल्याचं उघड झालं. 

संबंधित प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजीने सांगितलं की, मुलगी खूपच भयभीत झाली होती आणि नंतर ती म्हणाली की, तिला तिच्या कुटुंबियांसोबतच राहायचं नसल्याचं तिने सांगितलं, नंतर तिचा छळ देखील होऊ लागला होता. नंतर आजीनेच मुलीला सिगडी परिसरातील एका ओळखीच्या घरी सोडले होते. 

 हे ही वाचा : लॉ कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार! वर्गात गोळी झाडून तरुणीची हत्या अन् जागीच तरुणाची आत्महत्या... CCTV मध्ये कैद

सावत्र वडिलांकडून पीडितेवर लैंगिक अत्याचार 

या प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस पथकाने मुलीला एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरातूनच सुरक्षितपणे तिथून बाहेर काढले. नंतर मुलीला विश्वासात घेऊन चौकशी देखील केली, याबाबत तिने सांगितलं की 4 फेब्रुवारी रोजी रात्री तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर पीडिता घाबरून तिच्या आजीच्या घरी पळून गेली होती. संबंधित प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 65 (1) आणि पोक्सो अंतर्गत कलम 3/4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp