पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा अपघातात दुर्दैवी अंत, कारचा झाला चेंदामेंदा
Palghar Accident : पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद या महामार्गावर एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एका नेमबाजपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं देशातील क्रीडा जगताला मोठा धक्का बसला आहे. मृत्यू झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजाचं नाव संभाजी पाटील (वय 27) असे आहे. अपघाताची भीषणता पाहता, कारचा चेंदामेंदा झाल्याचं चित्र समोर आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
नेमबाजाचा दुर्दैवी मृत्यू
Palghar Accident : पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद या महामार्गावर एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एका नेमबाजाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं देशातील क्रीडा जगताला मोठा धक्का बसला आहे. मृत्यू झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजाचं नाव संभाजी पाटील (वय 27) असे आहे. अपघाताची भीषणता पाहता, कारचा चेंदामेंदा झाल्याचं चित्र समोर आलं.
हे ही वाचा : सावत्र वडिलांकडून 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, सीसीटीव्ही तपासातून झाला खुलासा
दरम्यान, फॉर्च्युनर कारच्या पुढील भागाचा चुरा झाला होता. दरवाजे तुटले होते आणि वाहनाचे काही पार्ट्स काही मीटर अंतरावर पडल्याचे आढळून आले होते. परिस्थिती इतकी भयानक होती की कारची स्थिती बदलून गेली होती.
नेमकं काय घडलं?
सोमवारी रात्री उशिराने संभाजी पाटील हा आपला सहकारी यश चौधरी (वय 22) याच्यासोबतच सरावासाठी पुण्याहून गुजरातकडे निघाला होता. महामार्गावरील मनोरजवळ, त्यांची भरधाव वेगाने जाणारी कार एका ट्रकला धडकली. धडक इतकी जोराची होती की कारचा चक्काचूर झाला आणि कारमध्ये असलेल्या संभाजी पाटील यांना वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण ते प्रयत्न निष्फळ ठरले.
हे ही वाचा : लॉ कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार! वर्गात गोळी झाडून तरुणीची हत्या अन् जागीच तरुणाची आत्महत्या... CCTV मध्ये कैद
संभाजी पाटील हे देशातील नेमबाजांपैकी एक होते. त्यांनी 25 मीटर स्टँडर्स पिस्तूल या खेळाच्या प्रकारात त्यानं आपलं नाव कमावले, तसेच ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाला गौरव मिळवून दिला.










