'शरद पवारांचं नाव, फोटो वापरू नका', अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Supreme Court On Ajit Pawar's NCP : सर्वोच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाला निवडणूक प्रचारादरम्यान शरद पवारांचा फोटो वापरू नये असे सांगितले आहे. स्वत:ची ओळख निर्माण करा आणि मते मिळवा असे न्यायालयाचे म्हणणे आहे. निवडणूक असताना तुम्हाला शरद पवारांची गरज आहे, पण निवडणुका नसताना त्यांची गरज नाही, असंही त्यात नमूद केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार मिळाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्याच बाजूने निर्णय दिला होता.  यानंतर शरद पवारांच्या गटाला तुतारी चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार असं नाव निवडणूक आयोगाने दिलं.

 
निकालानंतर निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज (14 मार्च) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्या कांत आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.


शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या लोकप्रियतेचा वापर सुरू आहे, असा मुद्दा अभिषेक मनू सिंघवी यांनी उपस्थित केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी ते म्हणाले, 'पक्ष वेगळा मग अजित पवार शरद पवारांचा फोटो का वापरतात? शरद पवारांची लोकप्रियता वेगळी आहे, तुमचा राजकीय पक्ष वेगळा आहे. शरद पवारांचा फोटो आणि नाव कुठेही वापरणार नाही असं लेखी लिहून द्या.' असे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना फटकारलं.

  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT