Asia Cup: सर जडेजाने रचला इतिहास! इरफान पठाणलाही टाकलं मागे

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Ravindra Jadeja created history for India in asia cup 2023.
Ravindra Jadeja created history for India in asia cup 2023.
social share
google news

Ravindra Jadeja, Asia Cup 2023: आशिया कप 2023 च्या सुपर 4 सामन्यात भारताने गतविजेत्या श्रीलंकेचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात नवा इतिहास रचणारा खेळाडू म्हणजे रवींद्र जडेजा. रवींद्र जडेजाने 10 षटकांत 33 धावा देत 2 बळी घेतले. मात्र या 2 विकेट्समुळे त्याने नवा इतिहास रचला आहे. जडेजा आता आशिया कपमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणला मागे टाकत त्याने हे स्थान मिळवले आहे.

ADVERTISEMENT

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी जडेजाच्या 22 विकेट होत्या आणि तो पठाणच्या बरोबरीत होता. पण आता त्याच्या नावावर 24 विकेट्स आहेत.

आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज

हे वाचलं का?

रवींद्र जडेजा – 24
इरफान पठाण – 22
कुलदीप यादव – 19
सचिन तेंडुलकर- 17
कुलदीप यादव – 15

टीम इंडिया फायनलमध्ये

श्रीलंकेचा फिरकीपटू ड्युनिथ वेलालगे याने टीम इंडियाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले होते. वेलालगेने निम्मा भारतीय संघ आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवला. रोहित शर्मा वगळता अन्य कोणताही भारतीय फलंदाज चमत्कार करू शकला नाही आणि भारताचा संपूर्ण संघ 213 धावांत गडगडला. दरम्यान, रोहितने वनडेमध्ये 10 हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताकडून सहावा फलंदाज ठरला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> India Alliance : ‘या’ 13 गोष्टी ठरवणार ‘इंडिया’चं भवितव्य, आता खरी कसोटी!

श्रीलंकेचा फिरकीपटू ड्युनिथ वेललागेने प्रथम आपल्या फिरकीने धुमाकूळ घातला, जिथे त्याने टीम इंडियासाठी 5 विकेट घेतल्या. यानंतर त्याने फलंदाजी करत 42 नाबाद धावाही केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता मात्र कुलदीप यादवने 4 विकेट घेत श्रीलंकेला पूर्णपणे रोखले आणि संघ 172 धावांवर गडगडला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Maratha Reservation : असा आहे मराठा आरक्षणाचा इतिहास?

श्रीलंकेविरुद्धच्या विजयासह टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आधी पाकिस्तानविरुद्ध २२८ धावांचा मोठा विजय आणि आता श्रीलंकेचा पराभव करून टीम इंडिया चार गुणांसह अंतिम फेरीत जाणारा पहिला संघ बनला आहे. भारताला आता सुपर-4 मधील शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध 15 सप्टेंबर रोजी खेळायचा आहे. जर श्रीलंकेला फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याला पुढच्या सामन्यात पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT