SA vs IND : टीम इंडियाला व्हाईटवॉश, अखेरच्या वन-डेत आफ्रिका ४ धावांनी विजयी
दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा शेवट गोड करण्यात टीम इंडियाला अपयश आलं आहे. केप टाऊनच्या मैदानावर झालेल्या अखेरच्या वन-डे सामन्यात भारताला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात आफ्रिकेने अखेरपर्यंत झुंज घेत मालिका ३-० ने जिंकली. टॉस जिंकून भारताने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉकची शतकी खेळी आणि रसी व्हॅन डर डसेनच्या […]
ADVERTISEMENT
दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा शेवट गोड करण्यात टीम इंडियाला अपयश आलं आहे. केप टाऊनच्या मैदानावर झालेल्या अखेरच्या वन-डे सामन्यात भारताला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात आफ्रिकेने अखेरपर्यंत झुंज घेत मालिका ३-० ने जिंकली.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून भारताने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉकची शतकी खेळी आणि रसी व्हॅन डर डसेनच्या अर्धशतकाच्या जोरावर आफ्रिकेने भारताला २८८ धावांचे आव्हान दिले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये आफ्रिकेचा संघ भारताच्या वरचढ ठरला होता. परंतू तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाची रणनीती चांगल्या पद्धतीने कामाला आली. शेवटच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे आफ्रिकेला अखेरच्या सामन्यांत ३०० चा टप्पा ओलांडता आला नाही.
Virat ची मुलगी पहिल्यांदाच जगासमोर, हाफ सेंच्युरीनंतर कोहलीचं खास सेलिब्रेशन पाहिलंत का?
हे वाचलं का?
प्रत्युत्तरात भारताकडून शिखर धवन, विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावली. संघाचा डाव गडगडला असताना तळाचा फलंदाज दीपक चहरनेही अर्धशतक ठोकले. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला आणि आफ्रिकेने हा सामना खिशात टाकला.
भारतीय डावाची सुरुवात आजच्या सामन्यात अडखळती झाली. एनगिडीने केएल राहुलला स्वस्तात माघारी धाडलं. विराट कोहली आणि शिखर धवन यांनी महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाचा डाव सावरवा. दोन्ही खेळाडूंनी आपली अर्धशतकं पूर्ण करत भारताला विजयाची आशा दाखवली. परंतू फेलुक्वायोने भारताला लागोपाठ दोन धक्के दिले. प्रथम त्याने धवनला नंतर पंतला बाद केले. यानंतर विराटने एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला खरा. परंतू ठराविक अंतराने मोक्याच्या क्षणी भारतीय फलंदाज माघारी परतत राहिले. दिपक चहरने अर्धशतक झळकावत भारताच्या आशा पल्लवित केल्या होत्या. परंतू त्याचेही प्रयत्न तोकडेच पडले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT