करमाळ्याचा सुयश टोकियो पॅरालिम्पिक गाजवण्यासाठी सज्ज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सुयश जाधव सध्या टोकियो मध्ये होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी सज्ज झालाय. क्रीडा विश्वात मानाचं स्थान असलेल्या या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा सुयश हा महाराष्ट्रातला पहिलाच स्पर्धक ठरला आहे. आपल्या अंपगत्वावर मात करत सुयशने जलतरण स्पर्धांमधून नाव कमावत थेट पॅरालिम्पिक स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे.

ADVERTISEMENT

वयाच्या १२ व्या वर्षी सुयशला एका अपघातात आपले दोन्ही हात गमवावे लागले. अशा परिस्थितीतही सुयशने अंपगत्वातून आलेल्या दुःखाला कवटाळून न बसता मोठ्या जिद्दीने जलतरणात यश मिळवलं. सुयशचे वडील नारायण जाधव हे उत्तम जलतरणपटू आहेत, आपल्या मुलाला भविष्यात मोठ्या स्पर्धेसाठी तयार करण्यात नारायण जाधव यांचाही मोलाचा वाटा आहे. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देशाला पहिलं सुवर्णपदक जिंकवून देण्याचा मानस असल्याचं सुयशने मुंबई तक शी बोलताना सांगितलं.

हे वाचलं का?

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये सुयशने आतापर्यंत १०० हून अधिक पदकं मिळवली आहेत. जकार्तामध्ये २०१८ साली झालेल्या आशियाई पॅरा स्पर्धेत सुयशने भारताला एक सुवर्ण तर दोन ब्राँझ पदक मिळवून दिली होती. या कामगिरीनंतर केंद्र सरकारने सुयशला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं होतं. यानंतर करमाळ्याचा सुशय टोकियोत भारताचा तिरंगा उंचावण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्या कामगिरीकडे यंदा सर्वांचं लक्ष असणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT