Tokyo Olympic : भारतीय हॉकी संघाची चांगली सुरुवात, न्यूझीलंडवर ३-२ ने मात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात आश्वासक केली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडला ३-२ च्या फरकाने हरवलं आहे. पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदरपाल आणि मनदीप सिंग यांनी केलेल्या गोलच्या आधारावर भारताने आपलं आव्हान कायम राखलं.

ADVERTISEMENT

काही मोजक्या बाबी वगळता भारतीय संघाचा या सामन्यातला खेळ चांगला होता. पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी गोल करत सामन्यात आघाडी घेतली. भारतीय संघाचा इतिहास पाहता पहिल्याच प्रयत्नात संघ पिछाडीवर पडला तर तो लवकर कमबॅक करत नाही. परंतू या सामन्यात भारताने सामन्यावरची पकड ढिली न होऊ देता संयमी खेळ केला. याचंच फळ म्हणून १३ व्या मिनीटाला रुपिंदरपाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करुन भारताला बरोबरी साधून दिली.

दुसऱ्या सत्राच्या अखेरीस भारताला पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक संधी मिळाली. ज्यात रुपिंदर आणि मनप्रीतने सुरेख चाल रचत न्यूझीलंडच्या गोलकिपरला चकवत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत २-१ अशी आघाडी घेतलेल्या भारताने तिसऱ्या सत्रात पेनल्टी कॉर्नवर आणखी एक गोल करत आपली आघाडी मजबूत केली. परंतू अखेरच्या सत्रात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आक्रमणाची धार वाढवली. भारतीय बचावपटूंवर दबाव टाकत न्यूझीलंडने ३० यार्डचं सर्कल भेदून आत प्रवेश केला.

हे वाचलं का?

४३ व्या मिनीटाला सुरेख मैदानी गोल करत न्यूझीलंडने आपली पिछाडी ३-२ ने कमी केली. अखेरच्या सत्रात न्यूझीलंडने भारतावर अनेक हल्ले चढवले. परंतू श्रीजेशच्या अभेद्य बचावापुढे हे सर्व प्रयत्न फोल ठरले. अखेरच्या सत्रात शॉर्ट पास आणि बॉलवर ताबा ठेवण्यात भारतीय खेळाडू कमी पडले असले तरीही पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यात भारताला यश आलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT