Tokyo Olympics 2020 : Bajrang Puniya ला कांस्यपदक, कझाकिस्तानच्या मल्लाचा उडवला धुव्वा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत भारताला आणखी एक पदक मिळालं आहे. ६५ किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियाला कांस्यपदक मिळालं आहे. कांस्यपदकाच्या लढतीत बजरंगने कझाकिस्तानच्या दौलेत नियाझबेकोव्हचा ८-० असा एकतर्फी पराभव केला. बजरंग कडून भारताला सुवर्णपदकाची आशा होती. परंतू उपांत्य फेरीत त्याला अझरबैजानच्या मल्लाकडून १२-५ असा पराभव स्विकाराला लागला होता.

कांस्यपदकासाठीच्या सामन्यात बजरंगसमोर कझाकिस्तानच्या दौलेत नियाझबेकोव्हचं आव्हान होतं. दोन्ही खेळाडू पहिल्या राऊंडमध्ये सुरुवातीचा काही काळ बचावात्मक खेळ करत होते. कझाकिस्तानच्या खेळाडूला जास्तवेळ बचावात्मक खेळ केल्यामुळे ३० सेकंदात गुण मिळवण्याचं आव्हान देण्यात आलं. ज्यात तो अपयशी ठरला आणि बजरंगने १-० अशी आघाडी घेतली. दुसरीकडे बजरंगही दौलेतवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत होता पण यात त्याला अपयश येत होतं. अखेरीस पहिल्या राऊंडच्या अखेरीस बजरंगने दौलेतला मैदानाबाहेर करत एका गुणाची कमाई केली. पहिल्या राऊंडअखेरीस बजरंगकडे २-० अशी आघाडी होती.

दुसऱ्या राऊंडमध्ये बजरंगने आक्रमक खेळ करत पहिल्यापासून आपलं वर्चस्व राखलं. या राऊंडमध्ये कझाकिस्तानच्या खेळाडूवर वर्चस्व मिळवण्यात बजरंग यशस्वी ठरला. दौलेतचा बचाव मोडून काढत बजरंगने त्याच्या पायांवर पकड बसवत सामन्यात मजबूत आघाडी घेतली. बजरंगच्या झंजावातासमोर कझाकिस्तानच्या खेळाडूचा निभाव लागत नव्हता. अखेरीस ८-० च्या फरकाने सामन्यात बाजी मारत बजरंगने कांस्यपदकाची कमाई केली. कुस्तीमधलं भारताचं हे दुसरं पदक ठरलं. याआधी रवी कुमारने भारताला रौप्य पदकाची कमाई करुन दिली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT