Tokyo Olympics 2020 : दीपक पुनियाचं पदकाचं स्वप्न भंगलं, शेवटच्या क्षणी रेपिचाज राऊंडमध्ये गमावला सामना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे रवी कुमारने भारताला ५७ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करुन दिली असताना दुसरीकडे दीपक पुनियाने मात्र निराशा केली आहे. ८६ किलो वजनी गटात रेपिचाज राऊंडमध्ये ब्राँझ पदकासाठी खेळणाऱ्या दीपक पुनियावर सॅन मरीनोच्या अमीन माईल्स नाझेमने ४-२ च्या फरकाने मात केली. अखेरच्या क्षणांमध्ये बचावात केलेला ढिसाळपणा दीपक पुनियाला चांगलाच महाग पडला.

ADVERTISEMENT

उपांत्य फेरीत अमेरिकेच्या खेळाडूसमोर पराभव स्विकाराव्या लागलेल्या दीपक पुनियाला रेपिचाज राऊंडमध्ये सॅन मरीनोच्या खेळाडूचा सामना करावा लागला. अमीन माईल्स नाझेम या खेळाडूवर नियंत्रण ठेवण्यात दीपक पुनियाला पहिल्या सत्रात यश आलं. अमीनच्या पायांचा वेळ घेत दीपकने दोन गुणांची कमाई केली. ही आघाडी दीपकने कायम राखली होती. पहिल्या सत्राच्या अखेरीस अमीनने एक सुंदर कमबॅक करत दीपकला मैदानाबाहेर नेत एक गुण कमावला.

Tokyo Olympics 2020 : भारताच्या खात्यात आणखी एक रौप्यपदक, कुस्तीपटू रवी कुमार अंतिम फेरीत पराभूत

हे वाचलं का?

दुसऱ्या सत्रात दीपक पुनियाने तीन मिनीटांच्या बाऊटमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वेळ खर्च करुन सामना आपल्या बाजूने झुकवला. परंतू अखेरच्या काही सेकंदांमध्ये सॅन मरीनेच्या अमीनने दीपक पुनियाच्या पायाची पकड घेत उलटफेर केला. मोक्याच्या क्षणी दोन गुणांची कमाई करत अमीनने सामन्यात ३-२ अशी आघाडी घेतली. भारताने या निर्णयाला आव्हान दिलं, परंतू हे आव्हान न टिकल्यामुळे सॅन मरीनोच्या खेळाडूला आणखी एक गुण बहाल करत ४-२ असा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालासोबत दीपक पुनियाचं कांस्यपदकाचं स्वप्नही संपुष्टात आलंय.

Tokyo Olympics: ‘एवढी वाईट कुस्ती कधी पहिली नाही’, विनेशच्या कामगिरीवर महावीर फोगाट प्रचंड नाराज

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT