बाळाच्या उपचारासाठी तिने ऑलिम्पिक पदकाचा केला लिलाव, शस्त्रक्रीयेसाठी उभे केले अडीच कोटी
ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकाची कमाई करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. दर ४ वर्षांनी भरणाऱ्या या स्पर्धेत शेकडो देशांचे खेळाडू पदकासाठी मैदानात उतरतात. काही दिवसांपूर्वीच जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. भारताने या स्पर्धेत ७ पदकांची कमाई करत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंवर त्या-त्या देशांत सध्या बक्षिसांचा वर्षाव सुरु आहे. अशावेळी भालाफेक […]
ADVERTISEMENT
ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकाची कमाई करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. दर ४ वर्षांनी भरणाऱ्या या स्पर्धेत शेकडो देशांचे खेळाडू पदकासाठी मैदानात उतरतात. काही दिवसांपूर्वीच जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. भारताने या स्पर्धेत ७ पदकांची कमाई करत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंवर त्या-त्या देशांत सध्या बक्षिसांचा वर्षाव सुरु आहे. अशावेळी भालाफेक प्रकारात रौप्यपदक कमावणाऱ्या पोलंडच्या खेळाडूने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
ADVERTISEMENT
टोकियोत पार पडलेल्या स्पर्धेत पोलंडच्या मारिया आंद्रेजिक या खेळाडूने भालाफेक प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. या कामगिरीनंतर देशात मारियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतू मायदेशी परतल्यानंतर मारियाला ८ महिन्यांच्या बाळाच्या हृद्यावर शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याचं समजलं. Miloszek Malysa नावाच्या या लहान बाळाच्या शस्त्रक्रीयेसाठी मदत म्हणून मारियाने आपल्या रौप्यपदकाचा लिलाव करण्याचं ठरवलं. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मारियाने आपल्या पदकाच्या लिलावातून जवळपास अडीच कोटींच्या घरात रक्कम जमा केली आहे.
मारियाच्या या कृतीनंतर सर्वच स्तरातून तिचं कौतुक केलं जात आहे. लहान बाळाच्या उपचारासाठी आपलं ऑलिम्पिक पदक लिलाव करणाऱ्या मारियाने आपला बहुमोल दागिना चांगल्या कामासाठी दिल्याची भावना बोलून दाखवली जात आहे. २०१६ साली रिओ ऑलिम्पिकमध्येही मारिया सहभागी झाली होती, परंतू त्यावेळी तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यानच्या काळात मारियाला कॅन्सरच्या आजाराने ग्रासलं, परंतू खिलाडूवृत्तीच्या मारियाने कॅन्सरवरही मात करत २०१८ साली पुन्हा एकदा मैदानावर कमबॅक केलं. यंदाच्या ऑलिम्पिकमध्येही फारशा अपेक्षा नसताना मारियाने रौप्यपदकाची कमाई करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या यशानंतरही तिने आपलं पदक एका चांगल्या कामासाठी लिलावात काढून एका बाळाचा जीव वाचवण्यात मोलाचा हातभार लावला आहे.
हे वाचलं का?
२५ वर्षीय मारियाने ऑलिम्पिकमधील यशस्वी कामगिरीनंतर अनोळखी व्यक्तीला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या बालकासाठी निधी गोळा करायचा होता. पोलंडच्या स्टोर जाबका नावाच्या व्यक्तिने सिल्वर मेडलला सर्वाधिक बोली लावत ते खरेदी केले. रक्कम जमा करुन संबंधित व्यक्तिने मेडल घेतल्याची माहितीही मारियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलीये.
Tokyo Olympics : जमैकाचा खेळाडू स्पर्धेआधी मैदानाचा रस्ता चूकला, Volunteer मुलीने केली मदत…जिंकलं गोल्ड मेडल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT