Tokyo Paralympic 2020 : मनीष नरवालचा ‘सुवर्ण’वेध; सिंहराजने पटकावलं ‘रौप्य’ पदक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ११व्या दिवसाची भारतीय खेळाडूंनी दणक्यात सुरूवात केली. बॅटमिंटनपटू प्रमोद भगतच्या जबरदस्त प्रदर्शनानंतर नेमबाजी स्पर्धेतही भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज कौतुकास्पद कामगिरी केली. अंतिम फेरीत पोहोचलेल्या मनीषने सुवर्ण पदकाचा वेध घेतला, तर सिंहराजने रौप्य पदक पटकावलं.

ADVERTISEMENT

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या ११व्या दिवशी शूटर मनीष नरवाल आणि सिंहराजने एसएच-१ श्रेणीतील नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर एअर पिस्टल प्रकारात चांगली कामगिरी केली. दोघांनीही क्वॉलिफिकेशन फेरीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.

अंतिम फेरीत मनीष नरवालने अचूक लक्ष्यभेद करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं. तर सिंहराजनेही रौप्य पदकाची कमाई केली. यामुळे भारताच्या खात्यात आणखी दोन पदकं जमा झाली आहेत.

हे वाचलं का?

अंतिम सामन्यात मनीष नरवालने २०९ गुण मिळवले. तर सिंहराजने २०७ गुणांसह रौप्य पदक जिंकलं. पात्रता फेरीत ५३६ गुणांसह अधानाने चौथ्या क्रमांक पटकावला. तर मनीष नरवाल ५३३ अंकांसह सातव्या क्रमांकवर राहिला होता. महत्त्वाचं म्हणजे सिंहराजने १० मीटर एअर पिस्टल प्रकारातही कांस्य पदकाची कमाई केली आहे.

मनोज सरकार कांस्य पदकासाठी खेळणार

ADVERTISEMENT

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरूष एकेरी बॅटमिंटन स्पर्धेतील एसएल-3 मध्ये भारताचा बॅटमिंटनपटू मनोज सरकारला पराभवाचा सामना करावा लागला. मनोज सरकारला बेथेल डॅनियलकडून पराभव स्वीकारावा लागला. २१-८, २१-१० अशा फरकाने मनोजचा पराभव झाला. मात्र, मनोजच्या पदकाच्या आशा अजूनही कायम आहेत. मनोज सरकार आता कांस्य पदकासाठी मैदानात उतरणार आहे. मनोजचा कांस्य पदकासाठी जपानच्या फुजिहारा डायसुकेविशीसोबत सामना होणार आहे. डायसुकेविशीला भारताच्या प्रमोद भगतने पराभवाची धुळ चारली.

ADVERTISEMENT

प्रमोद भगत सुवर्णपदकासाठी देणार झुंज

बॅटमिंटनपटू प्रमोद भगतने पुरूष एकेरीच्या एसएल-3 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या प्रवेशाबरोबरच प्रमोदनं रौप्य पदक निश्चित केलं असून, सुवर्णपदकासाठी तो आता मैदानात उतरणार आहे. प्रमोदचा सामना बेथेल डॅनियलशी होणार आहे. भारताच्या मनोज सरकारचा पराभव करून डॅनियलने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

बॅटमिंटनमध्ये एसएल-4 मध्ये डीएम सुहास यतिराजनेही चांगली कामगिरी केली. यतिराज अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयाबरोबरच यतिराजने भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केलं असून, आता तो सुवर्ण पदकासाठी खेळणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT