Tokyo ParaLympics 2020 : कुठे पाहू शकाल भारतीय खेळाडूंचे सामने, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१ सुवर्ण, दोन रौप्य आणि ४ कांस्य अशा ७ पदकांसह आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरीमुळे टोकियो ऑलिम्पिक भारतीय खेळाडूंच्या कायम लक्षात राहणार आहेत. पदक विजेच्या खेळाडूंचं अजुनही भारतात कौतुक सुरु असताना आता भारताचे दिव्यांग खेळाडू पॅरालिम्पिक गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. तसेच कोविडच्या धोक्यामुळे जपान सरकारने ही स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवायचं ठरवलं आहे.

ADVERTISEMENT

पॅरालिम्पिक खेळांमध्ये जलतरण, टेबल टेनिस, व्हिलचेअर तलवारबाजी, बास्केटबॉल यासह अन्य महत्वाचे खेळ समाविष्ट असणार आहेत. २४ ऑगस्टला दुपारी साडेचार वाजता पॅरालिम्पिक्स खेळांची Opening Ceremony रंगणार आहे. टोकियो पॅरालिम्पिक्स खेळाचं प्रक्षेपण Eurosport चॅनलवर केलं जाणार आहे. discovery+ app वर हे चॅनल दिसतं. भारतात Doordarshan वर टोकियो पॅरालिम्पिक्सचं प्रक्षेपपण केलं जाणार आहे. भारतीय खेळाडू सहभागी असलेल्या स्पर्धांचं प्रक्षेपण दूरदर्शनवर पाहता येणार आहे.

जाणून घ्या कसं असेल भारतीय खेळाडूंचं या स्पर्धेतलं आव्हान?

हे वाचलं का?

25 ऑगस्ट – टेबल टेनिस
-पहिला सामना सोनलबेन मुधभाई पटेल
-दुसरा सामना- भाविना हसमुखभाई पटेल

27 ऑगस्ट –

ADVERTISEMENT

तिरंदाजी
-पुरुष गट- हरविंदर सिंह, विवेक चिकारा
-पुरुष गट- राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी
-महिला गट- ज्योती बालियान
-महिला गट – ज्योति बालियान आणि टीबीसी

ADVERTISEMENT

पॉवरलिफ्टिंग
-पुरुष- 65 किलो गट- जयदीप देसवाल
-महिला- 50 किलो गट- सकीना खातून

स्विमिंग
-सुयश जाधव

28 ऑगस्ट – अ‍ॅथलेटिक्स

-पुरुष भालाफेक- रंजीत भाटी

29 ऑगस्ट – अ‍ॅथलेटिक्स
-पुरुष थाली फेक- विनोद कुमार
-पुरुष उंच उडी – निशाद कुमार, राम पाल

30 ऑगस्ट – अ‍ॅथलेटिक्स
-पुरुष थाली फेक – योगेश कथुनिया
-पुरुष भालाफेक – सुंदर सिंह गुर्जर, अजीत सिंह, देवेंद्र झाजरिया
-पुरुष भालाफेक – सुमित अंटिल, संदीप चौधरी

नेमबाजी
– पुरुष 10 मीटर एयर रायफल – स्वरूप महावीर उन्हालकर, दीपक सैनी
– महिला 10 मीटर एयर रायफल – अवनी लेखारा

31 ऑगस्ट – नेमबाजी
– पुरुष १० मीटर एयर पिस्टल – मनीष नरवाल, दीपेंदर सिंह, सिंहराज
– महिला १० मीटर एयर पिस्टल – रुबिना फ्रांसिस

अ‍ॅथलेटिक्स
-पुरुष उंच उडी- शरद कुमार, मारियप्पन थंगावेलू, वरूण भाटी
-महिला 100 मीटर – सिमरन
-महिला शॉटपुट – भाग्यश्री माधवराव जाधव

1 सप्टेंबर – बॅडमिंटन
– पुरुष एकेरी – प्रमोद भगत, मनोज सरकार
-महिला एकेरी- पलक कोहली
-मिश्र दुहेरी – प्रमोद भगत आणि पलक कोहली

अ‍ॅथलेटिक्स
पुरुष क्लब थ्रो – धर्मबीर नैन, अमित कुमार सरोहा

2 सप्टेंबर – बॅडमिंटन
-पुरुष एकेरी – सुहास लालिनाकेरे यातिराज, तरुण ढिल्लन
-पुरुष एकेरी- कृष्णा नागर
-महिला एकेरी – पारुल परमार
-महिला मिश्र – पारुल परमार आणि पलक कोहली

पॅरा कॅनॉइंग
महिला गट- प्राची यादव

तायक्वांडो
-महिला गट – 49 किलो- अरुणा तंवर

नेमबाजी
-मिक्स्ड – 25 मीटर पिस्टल – आकाश आणि राहूल जाखड

3 सप्टेंबर – नेमबाजी
-पुरुष – 50 मीटर रायफल – दीपक सैनी
-महिला – 50 मीटर रायफल – अवनी लेखारा

स्विमिंग
-350 मीटर बटरफ्लाई- सुयश जाधव, निरंजन मुकुंदन

अ‍ॅथलेटिक्स
-पुरुष उंच उडी – प्रवीण कुमार
-पुरुष भालाफेक – टेक चंद
-पुरुष शॉटपुट – सोमन राणा
-महिला क्लब थ्रो – एकता भ्यान, कशिश लाकडा

4 सप्टेंबर – नेमबाजी
– मिक्स्ड राउंड – 10 मीटर एयर रायफल – दीपक सैनी, सिद्धार्थ बाबू आणि अवनी लेखारा
– मिक्स्ड राउंड – 50 मीटर पिस्टल – आकाश, मनीष नरवाल आणि सिंहराज

अ‍ॅथलेटिक्स
-पुरुष भालाफेक – नवदीप सिंह

5 सप्टेंबर –

नेमबाजी
-मिक्स्ड राउंड – 50 मीटर रायफल-दीपक सैनी, अवनि लेखारा आणि सिद्धार्थ बाबू

पॅरालिम्पिक्स म्हणजे काय?

पॅरालिम्पिक्स ही देखील आंतरराष्ट्रीय अनेक खेळ खेळवण्यात येणारी क्रिडा स्पर्धा आहे. ज्यामध्ये ऑलिम्पिकप्रमाणेच खेळ असतात. ज्यात सांघिक खेळांसह वैयक्तीक स्पर्धा असतात. फक्त या ठिकाणी खेळणारे खेळाडू हे अपंगत्व असलेले असतात. ज्यात एखादा शरीराचा भाग नसणे, स्नायूंची कमतरता, पायाच्या लांबीत फरक, अत्यंत कमी उंची अशा अनेक प्रकारच्या शाररिक बाधा असणारे खेळाडू सहभाग घेतात. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीद्वारे (IPC) या खेळांचे आयोजन केले जाते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT