महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीवर दु:खाचा डोंगर, बहिण-आईला कोरोनामुळे गमावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत असताना वेदाच्या घरातील दोन जवळच्या व्यक्तींचं अवघ्या काही दिवसांच्या अंतरात कोरोनामुळे निधन झालं आहे. वेदा कृष्णमूर्तीचे माजी प्रशिक्षक इरफान सैत यांनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

दोन आठवड्यांपूर्वी वेदा कृष्णमूर्तीच्या आईचं कोरोनामुळे निधन झालं. यानंतर वेदाची मोठी बहीण वत्सला कृष्णमूर्ती यांची तब्येतही कोरोनाची लागण झाल्यामुळे खराब झाली. बंगळुरुतील एका हॉस्पिटलमध्ये वत्सला यांच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी वत्सला यांना ICU मधून जनरल वॉर्डात शिफ्ट करण्यात आलं. परंतू अवघ्या काही तासांत वत्सला यांचं निधन झालं. अवघ्या दोन आठवड्यात आई आणि बहिण अशा दोन महत्वाच्या व्यक्तींना गमवावं लागल्यामुळे वेदावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वत्सला यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यातच वत्सला यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरल्यानंतर त्यांच्या मुलांना सांभाळून धीर देणं सध्या महत्वाचं असल्याचं वेदा कृष्णमूर्तीच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितलं. गेल्या महिन्यात वेदाची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली होती. आपल्या आईच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करुन वेदाने खडतर काळात साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT