आता थांबायचं नाही…विराट कोहलीकडून IPL 2021 ची तयारी सुरु

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

२०२१ या नवीन वर्षात घरच्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय दौरा खेळणाऱ्या भारतीय संघाने बहारदार कामगिरी केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडचा टेस्ट सिरीजमध्ये ३-१, टी-२० सिरीजमध्ये ३-२ आणि वन-डे सिरीजमध्ये २-१ असा पराभव केला. रविवारी पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर दोन्ही संघांमध्ये अखेरचा वन-डे सामना खेळवला गेला. अटीतटीच्या या मॅचमध्ये भारताने ७ धावांनी बाजी मारली. इंग्लंडविरुद्धचा हा दौरा संपल्यानंतर सर्व भारतीय प्लेअर्स आता आयपीएलच्या आगामी सिझनसाठी सज्ज झालेत.

ADVERTISEMENT

अटीतटीच्या मॅचमध्ये भारताचा विजय, मालिकाही जिंकली

आयपीएलमध्ये RCB या टीमची कॅप्टन्सी करणाऱ्या विराटनेही एकही दिवस वाया न घालवता थेट सरावाला सुरुवात केली आहे. विराटने सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय ज्याला त्याने No rest days. From here on its all about speed #IPL…अशी कॅप्शन दिली आहे.

हे वाचलं का?

९ एप्रिलपासून आयपीएलच्या चौदाव्या सिझनला सुरुवात होणार आहे. विराट कोहलीच्या RCB संघाचा पहिलाच सामना रोहित शर्माच्या गतविजेत्या मुंबई इंडियन्ससोबत आहे. दरम्यान रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचे महत्वाचे प्लेअर्सही कँपमध्ये दाखल झाले आहेत.

९ एप्रिल ते ३० मे या कालावधीमध्ये आयपीएलचा चौदावा सिझन रंगणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता यंदाही बीसीसीआयने प्रेक्षकांविना आयपीएलचे सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT