Virat Kohli: कोहली म्हणतो.. ‘मी ब्रेक घेण्याचा प्रश्नच नाही, वनडे सीरीजसाठी उपलब्ध’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: वनडे टीमच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आल्यानंतर विराट कोहली हा नाराज असून तो आगामी दक्षिण अफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नसल्याच्या बातम्या अचानक समोर आल्या होत्या. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील द्वंद टोकाला गेलं असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर बुधवारी (15 डिसेंबर) विराट कोहलीने पत्रकार परिषद घेऊन या सगळ्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी वनडे सीरीजसाठी उपलब्ध आहे आणि वनडे सीरीज खेळायला तयार आहे.’ असं सांगत विराटने आपल्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने अनेक खुलासे केले आहेत. मात्र, सगळ्यात आधी त्याने हे स्पष्ट केलं आहे की, आपण दक्षिण अफ्रिकेतील वनडे मालिकेसाठी उपलब्ध असणार आहोत. भारतीय संघ गुरुवारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्याआधी विराटने पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडलं आहे.

‘दक्षिण अफ्रिकेत होणाऱ्या वनडे सीरीजसाठी मी उपलब्ध आहे. मी वनडे टीमचा कॅप्टन नसेन हे मला निवड समितीच्या सदस्यांनी मला कळवलं होतं. पण स्पष्ट करु इच्छितो की, मी निवडीसाठी उपलब्ध आहे.’ टी-20 आणि वनडेच्या कर्णधारपदी विराटच्या जागी निवड समितीने रोहित शर्माची निवड केल्यानंतर विराट नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. त्यामुळे अफ्रिका दौऱ्याआधी सर्व गोष्टींचा खुलासा करणं विराटला महत्त्वाचं वाटत असल्याने त्याने पत्रकार परिषद घेतली.

हे वाचलं का?

‘मी निवडीसाठी नेहमीच उपलब्ध’

‘मी निवडीसाठी कायम उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही मला असे प्रश्न विचारु नका. हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा जे मी उपलब्ध नाही, असं लिहितात किंवा त्यांच्या सूत्रांना. मी निवडीसाठी नेहमीच उपलब्ध आहे.’ असं म्हणत कोहलीने आपल्या हितशत्रूंना टार्गेट केलं आहे.

ADVERTISEMENT

‘मी दक्षिण अफ्रिकेच्या वनडे मालिकेतून ब्रेक मागितला असल्याच्या चर्चेत काहीही तथ्य नाही. मी वनडेसाठी उपलब्ध आहे आणि खेळण्यासाठी नेहमीच गंभीर आहे. जे खोट्या बातम्या लिहितात त्यांना जाऊन तुम्ही हा प्रश्न विचारा.’ असंही विराट यावेळी म्हणाला.

ADVERTISEMENT

विराटने बोलून दाखवली मनातील खदखद

दरम्यान, यावेळी विराटने आपल्या मनातील खदखद देखील बोलून दाखवली. ‘मला वनडे संघाचं नेतृत्व (Captaincy) करायचं होतं. पण निवडकर्त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. अगदी शेवटच्या क्षणी कॉल कट करताना त्यांनी मला सांगितलं की, यापुढ तू वनडे संघाचा कर्णधार नाहीस.’ असं विराट कोहली यावेळी म्हणाला.

Virat Kohli: ‘सिलेक्टर्सने अगदी कॉल कट करताना सांगितलं.. आता तू वनडेचा कॅप्टन नाही’, विराटने सांगितला ‘तो’ किस्सा

टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवड करताना निवड समितीने भारताच्या वन-डे संघाची कमानही रोहितच्या हातात दिली. या निर्णयामागचं लॉजिक आपल्याला माहिती असल्याचंही विराट म्हणाला. ही गोष्ट खरी आहे की आम्ही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, त्यामुळे हा निर्णय का घेण्यात आला याची मला कल्पना असल्याचंही विराटने सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT