विराट कोहलीने आतापर्यंत कमावले इतके अब्ज; इंस्टाग्रामच्या एका पोस्टसाठी घेतो कोट्यवधी रुपये

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

क्रिकेटच्या मैदानावर, जिथे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आपल्या बॅटने धावांचा वर्षाव करतो, तिथे तो कमाईच्या बाबतीतही पुढे आहे. विराट कोहली शनिवारी त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटसोबतच तो अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्याची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्याची भरपूर कमाई आहे. जाणून घेऊया विराट कोहलीकडे किती मालमत्ता आहे (विराट कोहली नेट वर्थ).

ADVERTISEMENT

1046 कोटी रुपये किमतीची संपत्ती

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहलीची गणना जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. mpl.live नुसार, कोहलीची एकूण संपत्ती सुमारे $127 दशलक्ष म्हणजेच सुमारे 1046 कोटी रुपये आहे. विराटची वार्षिक सरासरी कमाई 15 कोटी रुपये आहे. तर एका महिन्यात तो सव्वा कोटी रुपये कमावतो. कोहली एका आठवड्यात 28लाख 84हजार 615 रुपये आणि एका दिवसात सुमारे 5लाख 76हजार 923 रुपये कमावतो.

बीसीसीआयकडून मिळतात कोट्यवधी रुपये

विराट कोहलीची गणना जगातील सर्वात तेजस्वी फलंदाजांमध्ये केली जाते आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असताना त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत आणि जगभरात ओळख निर्माण केली आहे. विराट कोहलीचा भारतीय क्रिकेट संघाच्या A+ग्रेड करारात समावेश आहे. यामुळे तो करोडोंची कमाई करतो. तर दरवर्षी तो आयपीएलच्या माध्यमातूनही मोठी कमाई करतो. बीसीसीआयच्या A+ कराराद्वारे त्याला वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. तथापि, जर आपण मॅच फीबद्दल बोललो तर त्याला खेळाच्या फॉर्मॅटनुसार मॅच फी दिली जाते.

हे वाचलं का?

येथूनही मोठी कमाई होते

माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सोशल मीडियावरील त्याच्या फोटोंमुळे आणि प्रसिद्ध कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही भरपूर कमाई करतो. एवढेच नाही तर या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूकही केली आहे, जिथून त्याला भरघोस पैसा मिळत आहे. शिवाय, त्याच्या कमाईचा मोठा हिस्सा एंडोर्समेंटमधूनही येतो.

जाहिरात, गुंतवणूक आणि रेस्टॉरंट्स

Manyavar, MPL, Pepsi, Philips, Fastrack, Boost, Audi, MRF, Hero, Volvoline, Puma यांसारख्या ब्रँडच्या जाहिरातींमधून विराट मोठी कमाई करतो. कोहलीने ब्लू ट्राइब, चिझेल फिटनेस, नुएवा, गॅलॅक्टस फनवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि., स्पोर्ट कॉन्व्हो आणि अंक सारख्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने अलीकडेच दिवंगत गायक किशोर कुमार यांचा बंगला भाड्याने घेतला आहे. ज्यामध्ये त्याने एक अप्रतिम रेस्टॉरंट उघडले आहे. कोहलीच्या या रेस्टॉरंटचे नाव ‘One8 Commune’ आहे.

ADVERTISEMENT

विराटचे इंस्टावर 220 दशलक्ष फॉलोअर्स

विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 220 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. फॉलोअर्ससह सोशल मीडियावरून विराट कोहलीच्या कमाईबद्दल बोलायचे तर, तो इंस्टाग्रामवरील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इन्स्टावर सर्वाधिक फॉलो केलेल्या स्पोर्ट्स सेलिब्रिटींच्या यादीत विराट लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. हूपर एचक्यू 2022 इंस्टाग्राम रिच लिस्ट पाहता, टॉप-20 मध्ये भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा नंतर विराट कोहली एकमेव आशियाई आहे. यानुसार कोहली त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 8.9 कोटी रुपये घेतो.

ADVERTISEMENT

एकापेक्षा एक लक्झरी कारचा मालक

क्रिकेटसोबतच विराट कोहलीला कारचाही शौक आहे. कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये एकपेक्षा एक आलिशान कार आहे. रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीच्या जवळ जवळपास 6 लक्झरी कार आहेत. कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर कोहलीने ऑडी क्यू7 (70 ते 80 लाख रुपये), ऑडी आरएस5 (अंदाजे 1.1 कोटी रुपये), ऑडी आर8 एलएमएक्स (अंदाजे 2.97 कोटी रुपये), ऑडी ए8एल डब्ल्यू12 क्वाट्रो (अंदाजे रुपये 1.98 कोटी), लँड रोव्हर वोग आहे. (सुमारे 2.26 कोटी रुपये). त्याच्याकडे बेंटले फ्लाइंग स्पर (अंदाजे रु. 1.70- 3.41 कोटी) आणि बेंटले कॉन्टिनेंटल जीटी (अंदाजे रु. 3.29-4.04 कोटी) आहे असा दावाही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र, या गाड्या त्याच्या भावाच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT