शेतकरी आंदोलनाची चर्चा ड्रेसिंग रुमपर्यंत, विराट म्हणतो…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शेतकरी आंदोलनाची चर्चा आता थेट टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमपर्यंत पोहचली आहे. कारण आज (गुरुवार) झालेल्या टीम मिटिंगमध्ये देखील शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा झाली असल्याचं वृत्त आता समोर आलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आज अशी माहिती दिली की, टीम मिटिंगमध्ये शेतकरी आंदोलनाबाबत विस्तृतपणे चर्चा झाली. उद्यापासून (५ फेब्रुवारी) सुरु होणाऱ्या चेन्नई कसोटीआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विराटने ही माहिती दिली.

ADVERTISEMENT

कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ‘नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी जे आंदोलन सुरु केलं आहे त्याविषयी टीम मिटिंगमध्ये सविस्तर चर्चा झाली. ज्यामध्ये याविषयी सर्वांनी आपआपली मतं व्यक्त केली.’ कोहलीने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याआधी व्हर्च्युअल पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्याने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. जेव्हा विराट कोहलीला शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की, आम्ही याविषयी टीम मिटिंगमध्ये विस्तृतपणे चर्चा केली. सर्वांनी आपलं मतं यावेळी व्यक्त केली आहेत.

दरम्यान, विराट कोहलीने याआधी बुधवारी ट्विट देखील केलं होतं. त्यात विराटने असं म्हटलं होतं की, ‘या मतभेदाच्या वेळी आपण सर्वजण एक राहूयात. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. मला खात्री आहे की सर्व पक्षांमध्ये एक मैत्रीपूर्ण तोडगा निघेल.’

हे वाचलं का?

कोहलीच्या आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील शेतकरी आंदोलनावर ट्वीट केलं होतं. भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda, असं ट्विट त्याने केलं होतं.

गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक शेतकरी हे नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. याबाबत आता अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेलिब्रिटींनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, त्यानंतर देशातील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना तात्काळ प्रत्युत्तर देखील दिलं आहे. ज्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीचा देखील समावेश आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT