मानाची गदा, कोट्यवधींचं इनाम; WTC Final जिंकणाऱ्या संघासाठी ICC कडून बक्षीस जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१८ जून पासून इंग्लंडमध्ये साऊदम्पटनच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल मॅच खेळणार आहेत. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम जाहीर केली असून विजेत्या संघाला १२ कोटींच्या घरात रक्कम आणि मानाची गदा मिळणार आहे. ICC ने याबद्दल अधिकृत पत्रक काढून माहिती दिली.

ADVERTISEMENT

WTC Final : विराट विरुद्ध विल्यमसन, आतापर्यंतच्या करिअरमध्ये कोणाची आकडेवारी सरस?

पराभूत संघाला आयसीसीकडून ५ कोटींच्या घरात रक्कम मिळणार असून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाला ३ कोटींच्या घरात रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. चौथ्या क्रमांकावर आलेल्या संघाला २ कोटी तर उर्वरित संघांना आयसीसी ७३ लाखांच्या घरात बक्षीस देणार आहे.

हे वाचलं का?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप ही आयसीसीची महत्वाकांक्षी स्पर्धा मानली जाते. गेल्या २ वर्षांच्या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जात आहे. ज्यात भारत आणि न्यूझीलंडने अनुक्रमे पहिलं आणि दुसरं स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात आता कोणता संघ बाजी मारुन कोट्यवधींच्या बक्षीसाचा मानकरी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT