Arrow

सकाळी‘हे’ पदार्थ खाण्याची चूक कधीच करू नका...

Arrow

प्रत्येकाच्या आयुष्यातील सकाळ ही फार महत्वाची असते, कारण रात्रीच्या दीर्घ वेळेनंतर तुम्ही काही तरी सेवन करणार असता. त्यामुळे त्याचा परिणाम दिवसभर जाणवणारा असतो.

Arrow

आयुर्वेदानुसार सकाळच्या वेळेत काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे. कारण त्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

Arrow

सकाळी जर कोल्ड्रिंक्स घेत असाल तर त्याचा तुमच्या पचनशक्तीवर वाईट परिणाम होत असतो. 

Arrow

सकाळी उठल्यानंतर जड अन्न, तेलकट पदार्थ खाल्ल्यास त्याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. त्याचा दिवसभर त्रास होऊ शकतो. 

Arrow

सकाळच्या वेळेत दही खाल्ल्यास शरीरामध्ये श्लेष्मा तयार होतो. त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो, त्यामुळे फळं आणि दही खाल्यास त्याचा तुमच्यावर वाईटच परिणाम होतो.

Arrow

सकाळी सेवन करताना कोशिंबीर खाऊच नये. कारण ते कच्चे पदार्थ असतात. सकाळच्या वेळेत हे खाल्ले तर त्याचा पहिला परिणाम पचनशक्तीवरच होतो.

Arrow

गोड पदार्थ खाणेही टाळा कारण त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते, आणि त्याचा परिणाम दिवसभर जाणवतो. 

Arrow

सकाळी लोणचे किंवा व्हिनेगरने तयार केलेल्या वस्तूंचे सेवन टाळा. त्यामुळे पित्तदोषाच्या समस्या येऊ शकतात.

Arrow

दह्याप्रमाणेच सकाळी ताक पिल्यावरही त्याचा पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो ज्यामुळे पचनक्रियाही मंदावते.

खासदार पतीसोबत खास New Year सेलिब्रेशन; रोमँटिक झाली Parineeti!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा