Photo Credit; instagram

Arrow

Aadhar Update साठी मेसेज-कॉल येत आहेत? 'ही' चूक झाली तर..

Photo Credit; instagram

Arrow

ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. स्कॅमर्स यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. आता अशीच एक नवीन फसवणूक आधार कार्ड संबंधित होत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) लोकांना सावध राहण्यास सांगितले आहे. अलीकडच्या काळात अनेक स्कॅमर्स आधार तपशीलांचा अवलंब करून लोकांची फसवणूक करत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

आधार कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने निष्पाप लोकांना ऑनलाईन फसवणुकीचं बळी बनवलं जातंय. यासाठी यूजर्सना इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर मेसेज येत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

आधार कार्डच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्स बनावट ईमेल्सचाही वापर करतायत. माहिती विचारण्याच्या बहाण्याने, स्कॅमर यूजर्सकडून ओटीपी इत्यादी मागतात आणि बँक अकाउंट रिकामं करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

UIDAI ने  ट्विटरवर पोस्ट केली आहे की UIDAI कधीही ईमेल किंवा WhatsApp द्वारे आधार डिटेल्स अपडेट करण्यास सांगत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

पोस्टनुसार, आधार डिटेल्स अपडेट करण्यासाठी #myAadhaarPortal वर ऑनलाइन जा आणि ते अपडेट करा. अन्यथा जवळच्या आधार केंद्राशी संपर्क साधा. 

Photo Credit; instagram

Arrow

आधार कार्ड आता आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, ज्यामध्ये बँकेच्या डिटेल्सपासून ते घराचा पत्ता आणि मोबाइल नंबरपर्यंत सर्व काही नोंदवलं जातं. 

Photo Credit; instagram

Arrow

स्कॅमर तुमचे बँकेतील पैसे लुटण्यासाठी आधार कार्ड डिटेल्स वापरू शकतात. तसंच इतर बेकायदेशीर कामांसाठी वापरतात.

Photo Credit; instagram

Arrow

आधारशी संबंधित कोणताही मेसेज किंवा कॉल येत असेल तर, फोन कॉलवरील केवायसी प्रक्रिया टाळली पाहिजे. 

42 वर्षीय अभिनेत्रीने फक्त टॉवेलच गुंडाळला, ट्रोलर्सना म्हणाली..

पुढील वेब स्टोरी