Astrology : सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्मिती, 'या' राशींचा आजचा दिवस शुभ

मुंबई तक

• 12:26 PM • 17 Sep 2026

Astrology : कन्या राशीतील सूर्य आणि बुध यांचा हा दुर्मिळ संयोग अत्यंत शुभ अशा "बुधादित्य राजयोगा"चा पाया घालत आहे.  हा शक्तिशाली राजयोग 17 सप्टेंबर 2026 पासून ते 26 सप्टेंबरपर्यंत प्रभावी राहणार आहे, कारण बुध ग्रह हा तूळ राशीत प्रवेश करणार आहे. हा संयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे.

Google CTA
Astrology

1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य देवाला ग्रहाचा राजा मानले जाते. आत्मा, मान-सन्मान, नेतृत्व क्षमता आणि व पितृत्वाचे प्रमुख प्रतीक मानले जाते. सकाळी 7.53 वाजता, सूर्यदेवाने आपली स्वत:ची राशी, सिंह राशी सोडून आपली मित्र राशी, कन्यामध्ये प्रवेश केला. हा दिवस कन्या संक्रांती म्हणून ओळखला जातो.  
 

Astrology

2/5

कन्या राशीतील सूर्य आणि बुध यांचा हा दुर्मिळ संयोग अत्यंत शुभ अशा "बुधादित्य राजयोगा"चा पाया घालत आहे.  हा शक्तिशाली राजयोग 17 सप्टेंबर 2026 पासून ते 26 सप्टेंबरपर्यंत प्रभावी राहणार आहे, कारण बुध ग्रह हा तूळ राशीत प्रवेश करणार आहे. हा संयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे.

Astrology

3/5

सिंह 

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी, त्यांच्या राशीस्वामी सूर्याचे हे गोचर दुसऱ्या घरात बुधादित्य योगाची निर्मिती करते. याच काळात तुम्हाला अचानकपणे आर्थिक लाभ आणि नवीन स्त्रोत मिळतील. दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न सुटतील. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधीत वाद संपुष्टात येतील.  
 

Astrology

4/5

कन्या 

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी, ही उत्तम युती त्यांच्या राशीच्या पहिल्या घरात आहे. जिथे सूर्य ग्रह आणि उच्च राशीतील बुध एकत्र उपस्थित आहेत. याच प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्ये लक्षणीयरित्या वाढतील.  
 

Astrology

5/5

धनु 

धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा राजयोग दहाव्या घरात म्हणजेच, कार्य आणि करिअरच्या घरात आकार घेताना दिसत आहेत. येणारे काही दिवस व्यावसायिक जीवनासाठी सुवर्णकाळ ठरतील. 
 

हे वाचलं का?