Astrology : नवपंचम राजयोगाची निर्मिती, 'या' राशींचे लोक होणार समृद्ध
मुंबई तक
• 12:50 PM • 24 Sep 2026
Astrology : ग्रहांची स्थिती आणि त्यांच्यात योगाची निर्मिती होती, याच योग निर्मितीला एक विशेष महत्त्व दिले जाते. 23 सप्टेंबर 2026 च्या रात्री 9 वाजून 57 मिनिटांदरम्यान चंद्र हा मकर राशीतून कुंभ राशीत आणि नंतर तूळ राशीत विराजमान असलेला शुक्र ग्रहासोबत एक अत्यंत शुभ नवपंचम योग बनणार आहे. हा नवपंचम राजयोगाचा काही राशींना चांगला फायदा होईल.
ADVERTISEMENT


1/5
ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती आणि त्यांच्यात योगाची निर्मिती होती, याच योग निर्मितीला एक विशेष महत्त्व दिले जाते. 23 सप्टेंबर 2026 च्या रात्री 9 वाजून 57 मिनिटांदरम्यान चंद्र हा मकर राशीतून कुंभ राशीत आणि नंतर तूळ राशीत विराजमान असलेला शुक्र ग्रहासोबत एक अत्यंत शुभ नवपंचम योग बनणार आहे. हा नवपंचम राजयोगाचा काही राशींना चांगला फायदा होईल.


2/5
मेष
चंद्र हा तुमच्या राशीपासून अकराव्या घरात आहे, शुक्र हा सातव्या घरात आहे. उत्पन्नातील अनपेक्षित वाढ आणि इच्छापूर्तीचा तुमच्यावर परिणाम होईल. हा शुभ योग तुमच्या दैनंदिन उत्पन्नात लक्षणीय वाढ करणारा आहे. तुम्हाला नवीन व्यावसायिक भागीदारांशी जोडले जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत एका शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आणि भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल.
ADVERTISEMENT


3/5
मिथुन
तुम्हाला भाग्याची साथ पूर्ण मिळेल, प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण होतील. घरातील हा नवपंचम संयोग तुमच्या सुप्त भाग्याला जागृत करणार आहे. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मोठे यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती लक्षणीयरित्या मजबूत राहिल.


4/5
तूळ
शुक्र हा आपल्या पहिल्याच घरात प्रवेश करणार आहे आणि चंद्र ग्रह हा पाचव्या घरातून नवपंचम राजयोगाची निर्मिती होणार आहे. याचा तूळ राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व बदलणार. मानसिक ताण कमी होण्याची शक्यता आहे. कला, संगीत, फॅशन, मिडिया किंवा लेखन क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन आणि महत्त्वपूर्ण प्रकल्प मिळू शकतात, अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि तुमचे वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होईल.
ADVERTISEMENT


5/5
कुंभ
कुंभ राशीत चंद्र ग्रह हा तुमच्या स्वराशीत आला आहे आणि भाग्य स्वामी असल्याने तो शुक्रासोबत नवपंचम संबंध बनवत आहे.
ADVERTISEMENT











