Astrology : गजकेसरी योगामुळे तुमच्या आयुष्याला मिळणार नवी दिशा, 'या' राशींच्या लोकांना टेन्शन नॉट
मुंबई तक
22 Jun 2025 (अपडेटेड: 22 Jun 2025, 09:33 AM)
Astrology : गजकेसरी योग काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. या योगामुळे काही राशीतील लोकांना नोकरी व्यवसाय आणि पैसे मिळण्याची शक्यता आहे. चला आता याबाबत माहिती जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT


1/6
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू बृहस्पतीला विशेष मानले जाते. त्याला देवगुरू असे म्हणतात. गुरु हा ज्ञान,संपत्ती, शिक्षण आणि धर्माचाकारक आहे. अशातच आता गुरू हा मिथून राशींमध्ये राहणार आहे. या काळामध्ये त्याची चंद्रांशी युती होईल. यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल.


2/6
गजकेसरी योग काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. या योगामुळे काही राशीतील लोकांना नोकरी व्यवसाय आणि पैसे मिळण्याची शक्यता आहे. चला आता याबाबत माहिती जाणून घेऊयात
ADVERTISEMENT


3/6
गजकेसरी राजयोग कधी निर्माण होईल? याचं उत्तर ज्योतिषशास्त्राने दिले आहे. ज्योतिष पंचांगानुसार, चंद्र हा 24 जून रोजी रात्रीच्या सुमारास 11: 45 वाजता मिथून राशीत प्रवेश करणार आहे. तो 27 जून या तारखेपर्यंत येथेच वास्तव्य करणार आहे. या काळामध्ये गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. दरम्यान, हा योग सुमारे 54 तास टिकेल.


4/6
मिथून राशी
मिथून राशीच्या लोकांच्या आयुष्यात गजकेसर राजयोग निर्माण झाला आहे. यामुळे मिथून राशींच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. अभ्यासात यश मिळण्याची शक्यता आहे. लग्नासाठी वेळ चांगला आहे. तुम्हाला दीर्घकाळ आजारातून आराम मिळू शकेल आणि वैवाहिक जीवन सुखी असेल
ADVERTISEMENT


5/6
वृषभ राशी
या राशींच्या लोकांच्या संपत्तीच चांगली वाढ होणार आहे. तसेच वडिलोपर्जित व्यवसायात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची संधी मिळणार आहे. तसेच अडकलेले पैसे परत मिळू शकतात. सासरच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. समाजात चांगला आदर मिळेल.


6/6
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांचा आध्यात्माकडे अधिक कल असणार आहे. मेहनतीचे फळ मिळेल आणि खोळंबलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या भावंडांना पाठिंबा मिळेल. अभ्यासात चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. मुलांना आनंद मिळेल आणि नोकरीच्या ठिकाणी तुमच्या भावंडांचा पाठिंबा मिळेल.आयुष्यातील अडथळे आता दर होणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
