शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केल्याने लक्ष्मी-नारायण राजयोगाची निर्मिती, काही राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार

मुंबई तक

10 Aug 2025 (अपडेटेड: 10 Aug 2025, 11:07 AM)

astrology : बुध ग्रह हा आधीच कर्क राशीत आहे, अशा स्थितीत एक विशेष लक्ष्मी-नारायण राजयोग निर्माण झाला असून याचा काही राशीतील लोकांवर परिणाम होईल.

follow google news
Astrology

1/5

शुक्र ग्रहाला संपत्ती आणि समृद्धीचा देवता म्हटलं जातं. हाच शुक्र ग्रह कर्क राशीत 21 ऑगस्टपासून गोचर करणार आहे. तसेच 26 जुलैपासून शुक्र ग्रह हा मिथून राशीत आहे. बुध ग्रह हा आधीच कर्क राशीत आहे, अशा स्थितीत एक विशेष लक्ष्मी-नारायण राजयोग निर्माण झाला आहे. 
 

Astrology

2/5

लक्ष्मी-नारायण राजयोगाचा मिथुन, कन्या आणि धनु राशीतील लोकांच्या आयुष्यावर चांगला परिणाम होणार आहे. आनंद, संपत्ती आणि समृद्धीचे नवे दरवाजे उघडतील.

 

 

Astrology

3/5

मिथून राशी : लक्ष्मी-नारायण राजयोगामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन पर्याय निर्माण होतील. घरातील वातावरण सकारात्मक असेल. अविवाहितांच्या आयुष्यात जोडीदारांचा प्रवेश होणार आहे.

Astrology

4/5

कन्या राशी : काही लोकांच्या आयुष्यात प्रगतीची दारे खुली राहणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. कामकाजाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल, तसेच पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. 

Astrology

5/5

धनु राशी : व्यावसायिक जीवनात प्रगतीची शक्यता आहे. व्यवसाय वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. करिअरची वाढ कधीही तुमच्या दारावर ठोठावू शकते. सतर्क आणि तयार राहा.

हे वाचलं का?
follow whatsapp