Astrology : बुधाचा कर्क राशीत प्रवेश, ऑगस्ट महिन्यात 'या' राशींचं नशीब चमकणार
मुंबई तक
• 12:03 PM • 03 Aug 2026
Astrology : कर्क राशीतील बुध ग्रहाचे संक्रमण हे 22 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. बुध आणि चंद्राच्या एकत्रित मिलनाने काही खास राशींच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारू शकते. धन, करियर आणि व्यापाराच्यादृष्टीने काही राशींना वरदान प्राप्त झालं आहे.
ADVERTISEMENT


1/7
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा म्हणून ओळखल्या जाणारा बुध ग्रह बुद्धिमत्ता, व्यवसाय, तर्क आणि मधुर वाणी यांचा घटक मानला जातो. जेव्हा बुध ग्रह हा आपली मार्गक्रमण बदलतो, तेव्हा सर्वच राशींवर त्याचा परिणाम होतो, मात्र त्यापैकी काही राशींवर विशेषत: परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.


2/7
कर्क राशीतील बुध ग्रहाचे संक्रमण हे 22 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. बुध आणि चंद्राच्या एकत्रित मिलनाने काही खास राशींच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारू शकते. धन, करियर आणि व्यापाराच्यादृष्टीने काही राशींना वरदान प्राप्त झालं आहे.
ADVERTISEMENT


3/7
मेष
मेष राशीतील लोकांसाठी बुध ग्रह हा काही राशींमध्ये परिवर्तन घडवून आणणार आहे. अधिक काळापासून जर आपण गाडी, जमीन, दुकानाचा विचार करत असाल तर आपले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांची साथ मिळून व्यापारात सकारात्मक बदल घडून येणार आहे.


4/7
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांचा अडकलेला पैसा पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. आपल्या संवाद शौलीचा लोकांवर चांगला परिणाम होणार आहे. यावरून नोकरीत किंवा व्यापारात त्याचा चांगला फायदा होईल.
ADVERTISEMENT


5/7
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी 22 ऑगस्ट रोजी प्रगतीची नवीन वाट सुरू होईल. ज्या महत्त्वाच्या कामांची किंवा प्रकल्पाची वाट पाहता, त्यात आता प्रचंड प्रगती दिसून येईल.


6/7
तूळ
या राशीच्या लोकांना कष्टाचे फळ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल, वरिष्ठांकडून पाठिंबा मिळणार असून नोकरीत पदोन्नती, पगारवाढ किंवा एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी मिळेल.
ADVERTISEMENT


7/7
मकर
बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केल्याने मकर राशीच्या लोकांना भागीजारी व्यवसायात लक्षणी आणि अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांसोबत नाते दृढ होईल.
ADVERTISEMENT











