Astrology : बुध ग्रहाच्या नक्षत्रात होणार बदल, 'या' राशींना मोठा फायदा होईल
मुंबई तक
03 May 2026 (अपडेटेड: 03 May 2026, 01:03 PM)
Astrology : बुध, ग्रह हा सोमवारी 25 मे 2026 च्या रात्री आपले नक्षत्र बदलणार आहे. तो मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करेल आणि 2 जून 2026 पर्यंत तिथेच राहील. बुध ग्रहाचे गोचर शिक्षण, लेखन, व्यवसायिक आणि सल्लागार यांसारख्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी प्रभावी ठरेल.
ADVERTISEMENT


1/5
बुध नक्षत्र गोचर 2026 : ग्रहांचा राजकुमार बुध, ग्रह हा सोमवारी 25 मे 2026 च्या रात्री आपले नक्षत्र बदलणार आहे. तो मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करेल आणि 2 जून 2026 पर्यंत तिथेच राहील. बुध ग्रहाचे गोचर शिक्षण, लेखन, व्यवसायिक आणि सल्लागार यांसारख्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी प्रभावी ठरेल.


2/5
मृगशिरा नक्षत्र हे जिज्ञासा आणि शोधववृत्तीचे प्रतीक मानले जाते. तर्क आणि बुद्धीचा देव बुध या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा लोकांची शिकण्याची क्षमता आणि तार्किक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. नवीन योजना राबवण्यासाठी आणि व्यावसायिक बाबी अंतिम राहण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो.
ADVERTISEMENT


3/5
मेष
मेष राशीसाठी, बुध ग्रहाचे मेष राशीतील गोचर एक वरदान आहे. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित संधी मिळेल. आपल्या उत्पन्नात वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. आपण बऱ्याच काळापासून एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे. करिअरमध्ये प्रगतीसोबतच, प्रलंबित कामेही पूर्ण होण्याची अधिक शक्यता आहे.


4/5
कन्या
कन्या राशीवर स्वत: बुध ग्रहाचे अधपती आहे, यामुळे मृगशिरा नक्षत्राच्या प्रवेशामुळे मोठा आर्थिक लाभ होण्याची अधिक शक्यता आहे. मेहनतीच्या कामाच्या ठिकाणी दाखल घेतली जाणार आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक देखील होईल. अशातच तुम्हाला पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची अधिक शक्यता जारी करण्यात आली.
ADVERTISEMENT


5/5
धनु
धनु राशीतील लोकांना बुधाचे हे संक्रमण जीवनात नवीन दिशा आणि प्रगती आणेल. दीर्घकाळापासून चालत आलेले कौटुंबिक संघर्ष आणि समस्या सुटल्यासारख्या वाटतील, ज्यात सुटकेचा नि:श्वास टाकता येईल.
ADVERTISEMENT












