आजपासून 'या' राशींचे नशीब उजळणार, शनिदेवामुळे आर्थिक लाभ मिळणार

मुंबई तक

• 01:51 PM • 22 Apr 2026

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायाची देवता असलेल्या शनी ग्रहाला कर्माचे फळ देणारा ग्रह म्हटले जाते. 22 एप्रिल रोजी पहाटे 4:49 वाजता शनी ग्रहाचा उदय होईल. शनी ग्रहाचा हा उदय काही राशींसाठी परिणामकारक आहे. 

follow google news
Astrology

1/6

ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायाची देवता असलेल्या शनी ग्रहाला कर्माचे फळ देणारा ग्रह म्हटले जाते. 22 एप्रिल रोजी पहाटे 4:49 वाजता शनी ग्रह हा अस्ताचा उदय होईल. शनी ग्रहाचा हा उदय सर्व राशींवर परिणामकारक आहे. 
 

Astrology

2/6

शनीची शक्ती ही व्यक्तीच्या मेहनतीवर आणि यशावर थेट परिणाम करते. जेव्हा शनी ग्रह उगवतो, तेव्हा त्याचा प्रभाव अधिक शक्तीशाली होतो. अशातच काही राशींसाठी भाग्यवान आणि प्रगतीची नवीन दारे खुली होतील. 
 

Astrology

3/6

वृषभ 

वृषभ राशीतील लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर आहे. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतील. 

Astrology

4/6

मिथुन 

करिअरच्या बाबतीत हा काळ लोकांसाठी महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक ओळख मिळेल आणि व्यवसायिक दौऱ्यांमुळे फायदा होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल, मात्र तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. 
 

Astrology

5/6

तूळ 

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी, शनीच्या उदयामुळे कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल , तर हिच वेळ योग्य आहे. व्यवसायातील गुंतवणूकीतून नफा मिळेल आणि आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. 

Astrology

6/6

धनु 

धनु राशीसाठी नवीन जबाबदाऱ्या आणि यश घेऊन येतो. आर्थिक संधी वाढतील आणि नवीन भागीदारीतून व्यवसायात भरीव नफा मिळेल. तुमच्या सहकाऱ्यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. 
 

हे वाचलं का?
follow whatsapp