अक्षय्य तृतीया रोजी दुर्मिळ योग, 'या' राशीतील लोकांवर पडणार पैशांचा पाऊस, तर काही अविवाहितांचे हात मेहंदीने रंगणार

मुंबई तक

• 01:27 PM • 14 Apr 2026

Astrology : अक्षय्य तृतीया अधिक विशेष मानली जाते, कारण या दिवशी शुक्र ग्रह हा वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह हा धन, समृद्धी, सुखसोयी आणि भौतिक ऐश्वर्यासाठी जबाबदार मानला जातो, याचा फायदा काही राशींसाठी महत्त्वाचा आहे.

follow google news
Astrology

1/5

हिंदू पंचांगानुसार, यंदाच्या वर्षी अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दोन्ही दृष्टीकोनातून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, कारण या दिवशी केलेल्या कर्मांचे दूरगामी सकारात्मक परिणाम मिळेल अशा विश्वास आहे. 
 

Astrology

2/5

हिच अक्षय्य तृतीया अधिक विशेष मानली जाते, कारण या दिवशी शुक्र ग्रह हा वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह हा धन, समृद्धी, सुखसोयी आणि भौतिक ऐश्वर्यासाठी जबाबदार मानला जातो, याचा फायदा काही राशींसाठी महत्त्वाचा आहे.
 

Astrology

3/5

मेष 

मेष राशीसाठी हा काळ तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा असू शकतो बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पाठिंबा मिळेल आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. 
 

Astrology

4/5

वृषभ 

या राशीसाठी हे संक्रमण विशेषत: फायदेशीर मानले जाते, कारण शुक्र हा राशीत प्रवेश करणार आहे. अशातच उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात आणि आर्थिक समस्या हळूहळू कमी होऊ शकतात. जीवनात सुखसोयी आणि ऐश्वर्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. 
 

Astrology

5/5

कन्या

कन्या राशीतील लोकांसाठी या काळात नवीन बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात आणि विवाहाबाबतीत सकारात्मक माहिती मिळण्याची शक्यता आहे. 
 

हे वाचलं का?
follow whatsapp