Astrology : अक्षय्य तृतीयाला 'या' राशीतील लोकांना आर्थिक फायदा होणार, जाणून घ्या धार्मिक यात्रा आणि योग
मुंबई तक
• 12:42 PM • 19 Apr 2026
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, आजच्या दिवशी ग्रह-नक्षत्रांची अनुकूलता ही प्रत्येक राशीला वेगवेगळा लाभ देणार आहे. विशेष दिवशी तुमच्या राशीचे भविष्य जाणून घ्या आणि शुभ कार्यासाठी योग्य वेळेचा फायदा घ्या, अशातच जाणून घेऊयात एकूण राशीभविष्यचा अंदाज.
ADVERTISEMENT


1/5
अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानला जाणारा सण आहे. वैशाख शुक्ल तृतीया तिथीवर हा सण साजरा केला जातो. या सणादिवशी सोने-नाणे खरेदी आणि धार्मिक कार्यासाठी हा सण महत्त्वपूर्ण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजच्या दिवशी ग्रह-नक्षत्रांची अनुकूलता ही प्रत्येक राशीला वेगवेगळा लाभ देणार आहे. विशेष दिवशी तुमच्या राशीचे भविष्य जाणून घ्या आणि शुभ कार्यासाठी योग्य वेळेचा फायदा घ्या, अशातच जाणून घेऊयात एकूण राशीभविष्यचा अंदाज.


2/5
मेष
मेष राशीतील लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय किंवा गुंतवणूक सुरु करण्यासाठी आजचा उत्तम दिवस आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आजच्या दिवशी सोने खरेदी करणे फायद्याचे ठरेल.
ADVERTISEMENT


3/5
कन्या
कन्या राशीतील लोकांसाठी बौद्धिक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. लेखन, संशोधन किंवा शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक स्थिरता येईल, कुटुंबात वृद्ध सदस्यांचा आशीर्वाद घ्या.


4/5
वृषभ
वृषभ राशीतील लोकांच्या करिअरमध्ये प्रगती होईल, तसेच उच्च अधिकाऱ्यांचे प्रस्ताव येण्याची शक्यता असते. आजच्या दिवशी मंदिरात जाऊन पूजा करणे फायदेशीर आहे.
ADVERTISEMENT


5/5
वृश्चिक
वृश्चिक राशीतील गुप्त धनप्राप्तीची शक्यचा अधिक आहे. शत्रूंचा पराभव होईल. धार्मिक यात्रा किंवा पूजेचा योग आहे.
ADVERTISEMENT












