ऑक्टोबर महिन्यातील 'या' तारखेला काही राशीतील लोकांच्या सर्व समस्या दूर होणार आणि...
मुंबई तक
30 Sep 2025 (अपडेटेड: 30 Sep 2025, 09:26 AM)
Astrology : बुध ग्रह हा व्यवसायासाठी खास जबाबदार असलेला ग्रह म्हणून मानला जातो. हा ग्रह वेळोवेळी आपली स्थिती बदलू लागते. याचा सर्व राशीतील लोकांवर परिणाम होतो.
ADVERTISEMENT


1/5
वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा व्यवसायासाठी खास जबाबदार असलेला ग्रह म्हणून मानला जातो. हा ग्रह वेळोवेळी आपली स्थिती बदलू लागते. याचा सर्व राशीतील लोकांवर परिणाम होतो. सध्या बुध ग्रह हा सूर्य ग्रहासोबत कन्या राशीत आहे आणि तो त्याच्या अस्ताच्या अवस्थेत आहे. 2 ऑक्टोबर रोजी बुध कन्या राशीत उगवेल. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी तो तूळ राशीत प्रवेश करेल, यामागील जाणून घेऊया कोणत्या राशीतील लोकांना याचा एकूण फायदा होणार आहे.


2/5
मेष राशीसाठी, बुध ग्रह हा तिसऱ्या घरात असणार आहे, हा काळ आत्मविश्वास वाढवणारा आहे. भावंडांसोबत आणखी जवळीकता वाढण्याची शक्यता आहे. या काळात काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, तसेच कामाच्या ठिकाणी जुन्या समस्या दूर होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


3/5
सिंह राशीतील लोकांसाठी बुध लाभाच्या घरात उदयास येईल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूर राहण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून सुरु असलेल्या आर्थिक समस्या सोडवल्या जाण्याची शक्यता आहे. या काळात, तुम्ही बचत करण्यास यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबतचा वेळ घालवण्यासाठी हा काळ फायदेशीर आहे. जुने वाद सामंजस्यपणे सोडवले जातील.


4/5
धनु राशीतील लोकांसाठी बुध ग्रह हा सातव्या घरात आहे. हा काळ व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती करू पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. व्यावसायिकांना एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो, ज्यामुळे चांगला नफा मिळण्याती शक्यता आहे.
ADVERTISEMENT


5/5
बुध राशीचा उदय मेष, सिंह आणि धनु राशींसाठी सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. हा काळ तुमच्या करिअर, आर्थिक परिस्थिती आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
ADVERTISEMENT
