हनुमान जयंती दिवशी 'या' राशीतील लोकांवर बजरंगबलीचा आशीर्वाद राहणार

मुंबई तक

• 02:17 PM • 02 Apr 2026

Astrology : हनुमान जयंती दिवशी या राशीतील लोकांवर नेमका कसा परिणाम होणार ते जाणून घ्या.

Google CTA
Astrology

1/4

हनुमान जयंती दरवर्षी चैत्र शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरी केली जाते. दरम्यान असे मानले जाते हनुमानाचा जन्म याच पवित्र दिवशी झाला. 2026 मध्ये हनुमान जयंती ही 2 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी हनुमंतरायाचा कोणत्या राशीतील लोकांवर नेमका कसा परिणाम असेल, हे जाणून घेऊयात. 

Astrology

2/4

मेष

राशीचा अधिपती म्हणून मंगळ ग्रहाची ओळख आहे. ज्याच्या भगवान हनुमानाशी विशेष संबंध असल्याचे मानले जात आहे. बजरंगबलीची नियमित पूजा केल्याने त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते, करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. आरोग्याची समस्या कमी होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

3/4

सिंह 

सिंह राशीचा अधिपती हा सूर्य ग्रह आहे. यामुळे सिंह राशीतील जन्मलेले लोक भगवान हनुमंतरायाला अत्यंत प्रिय मानतात. जे लोक भगवान हनुमानाचा आश्रय घेतात, त्यांना जीवनात तुलनेने कमी संघर्ष करावा लागतो. 
 

Astrology

4/4

वृश्चिक 

मंगळ ग्रह हा वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे, या राशीत जन्मलेल्यांसाठी भगवान हनुमंतरायाची उपासना करणे विशेषत: फायदेशीर मानले. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार, नियमित उपासनेनं आर्थिक अडचण लवकर दूर होण्याची शक्यता आहे. 
 

हे वाचलं का?