दसऱ्या दिवशी काही राशीतील लोकांच्या सर्व समस्या दूर होणार, काय सांगतं राशीभविष्य?
मुंबई तक
02 Oct 2025 (अपडेटेड: 02 Oct 2025, 10:22 AM)
astrology : बुध ग्रहाच्या राशीच्या उदयामुळे काही राशीतील लोकांना चांगलाच फायदा मिळणार असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं, त्याचं कारणंही तसंच आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी व्यवसायाचा कारक मानला जातो. हा वेळोवेळी आपली जागा बदलण्याचे काम करत असतो.
ADVERTISEMENT


1/5
बुध राशीच्या उदयामुळे काही राशीतील लोकांना चांगलाच फायदा मिळणार असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं, त्याचं कारणंही तसंच आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी व्यवसायाचा कारक मानला जातो. हा वेळोवेळी आपली जागा बदलण्याचे काम करत असतो.


2/5
बुध ग्रहाच्या उदयाचा काळ आणि महत्त्व :
ज्योतिषशास्त्रानुसार, 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:25 वाजता बुध ग्रह हा कन्या राशीत येईल. तसेच 3 ऑक्टोबर म्हणजेच दुसऱ्या दिवशी तो तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाचा उदय हा मेष, सिंह आणि धनु राशीसाठी विशेषत: फलदायी ठरेल. या राशींना करिअर. व्यवसाय, नातेसंबंध आणि आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल घडलेला अनुभवायला मिळेल.
ADVERTISEMENT


3/5
मेष राशी :
मेष राशीसाठी, बुध ग्रह हा तिसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. हा काळ आत्मविश्वास वाढवणारा असेल. भावंडांसोबतचे नातेसंबंध आणखी घट्ट राहतील. या काळात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.


4/5
सिंह राशी :
सिंह राशीसाठी, बुध ग्रह हा लाभाच्या घरात उदयाल येईल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून सुरु असलेल्या आर्थिक समस्या सोडवल्या जाऊ शकतात.
ADVERTISEMENT


5/5
धनु राशी :
धनु राशीसाठी, बुध ग्रह हा सातव्या घरात असणार आहे. हा काळ व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीला असेल, यामुळे चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. काम करणारे व्यवसायिक सहकाऱ्यांशी त्यांचे संबंध सुधारण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
