नवरात्रौत्सवात 25 सप्टेंबरपासून 'या' राशीतील काही लोकांच्या भाग्याचे दरवाजे उघडतील, काय सांगतं राशीभविष्य?
मुंबई तक
23 Sep 2025 (अपडेटेड: 23 Sep 2025, 10:50 AM)
Astrology : ग्रहांच्या हालचालीचा आणि त्यांच्या युतीचा माणसांच्या जीवनावर मोठा परिणाण होतो. यंदा शारदीय नवरात्रौत्सवात, गुरु ग्रह आणि शुक्र ग्रहा यांच्यातील एकूण युतीमुळे अर्धकेंद्र .योगाची निर्मिती होणार आहे. तसेच याचा तीन राशींवर चांगला परिणाम होणार आहे.
ADVERTISEMENT


1/5
ग्रहांच्या हालचालीचा आणि त्यांच्या युतीचा माणसांच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. यंदा शारदीय नवरात्रौत्सवात, गुरु ग्रह आणि शुक्र ग्रह यांच्यातील एकूण युतीमुळे अर्धकेंद्र योगाची निर्मिती होणार आहे. तसेच याचा तीन राशींवर चांगला परिणाम होणार आहे.


2/5
वृषभ राशी :
वृषभ राशीसाठी, अर्धकेंद्र योग अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवू आणू शकतो. या योगाच्या प्रभावामुळे कौटुंबिक आनंद वाढण्याची शक्यता आहे. तसेच वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद वाढण्याची शक्यता आहे. मालमत्ता आणि इमारतींशी संबंधित बाबबीत नफा मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


3/5
सिंह राशी :
सिंह राशीतील लोकांसाठीचे हे संयोजन अत्यंत शुभ राहण्याची शक्यता आहे. शुक्र हा लग्नाच्या घरात असल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. आत्मविश्वास आणि धौर्य वाढण्याची शक्यता आहे.


4/5
धनु राशी :
धनु राशीसाठी अर्धकेंद्र योग भाग्यवान ठरणार आहे. या काळात प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण होतील. तसेच नवीन संधी निर्माण होईल. आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढेल, परदेशातील प्रवास करणे शक्य होईल.
ADVERTISEMENT


5/5
गुरु ग्रह हा शुक्र ग्रहाच्या 45 अंशाच्या कोनात येताच अर्धकेंद्र योग तयार होतो. हा योगामुळे संपत्ती, समृद्धी आणि यशाचे नवीन दरवाजे उघडले जाणार आहेत.
ADVERTISEMENT
