ऑक्टोबर महिन्यात 'या' तारखेला निर्माण होणार विष योग, काही राशीतील लोक येणार अडचणीत, नेमकं करावं काय? वाचा
मुंबई तक
01 Oct 2025 (अपडेटेड: 01 Oct 2025, 09:52 AM)
Astrology : 6 ऑक्टोबर रोजी, विष योग निर्माण होणार आहे, याचा काही राशीतील लोकांना वाईट अनुभवाचा सामना करावा लागणार आहे, यावर उपाययोजना म्हणून ज्योतिषशास्त्राने नेमकं काय सांगितलं वाचा.
ADVERTISEMENT


1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालीमुळे वेळोवेळी शुभ आणि अशुभ योग निर्माण होताना दिसतात, ज्याचा मानवाच्या जीवनावर आणि जागतीक घटनांवर मोठा परिणाम होताना दिसतो. या वर्षी 6 ऑक्टोबर रोजी, विष योग नावाचा एक दुर्मिळ आणि अशुभ मानला जाणारा योग निर्माण होणार आहे. कुंभ राशीत शनि आणि चंद्राच्या युतीमुळे 30 वर्षानंतर हा योग निर्माण होणार आहे. याच योगाचा काही राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.


2/5
मेष राशी :
मेष राशीसाठी हा काळ आव्हानात्मक असू शकतो. तुमच्या कुंडलीच्या बाराव्या घरात विष योग निर्माण होणार आहे. या काळात अनावश्यक खर्च टाळावा. भागीदारांना व्यवसायात नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. कामाच्या ठिकाणी बॉससोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


3/5
मीन राशी :
मीन राशीतील लोकांना त्याच्या पहिल्या राशीच्या पहिल्या घरातच विष योग निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये मीन राशीतील लोकांनी सावधानता बाळगावी. कोणालाही उधार पैसे देऊ नये, यामुळे परतफेड करणं कठीण होईल. जोडीदाराचे आयुष्य बिघण्याची शक्यता आहे.


4/5
सिंह राशी :
सिंह राशीत आठव्या घरात विष योग निर्माण होईल, जे रहस्य, आरोग्य आणि जोखीमेशी संबंधित आहे. तसेच आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेवरही परिमाण होण्याची शक्यता आहे, म्हणून वाद टाळणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT


5/5
तुम्ही कोणते उपाय करावेत? शनिवारी शनिदेवाची पूजा करा आणि तीळ दान करा. चंद्राला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी दूध किंवा तांदूळ दान करा. हनुमान चालीसा नियमितपणे पठण करा. अनावश्यक खर्च आणि धोकादायक गुंतवणूक टाळा.
ADVERTISEMENT
