Vastushastra : आपल्या घरातील कपाट किंवा तिजोरी हे फक्त वस्तू ठेवण्याचे साधन नसून ते घराची ऊर्जा आणि सुख-समृद्धीचे प्रतीक देखील आहे. आपण याचा वापर कपडे, पैसा आणि मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी करतो. मात्र अनेकदा जागेच्या कमतरतेमुळे किंवा सोयीसाठी आपण त्याच्यावर पुस्तके, जुने कपडे, डबे आणि अनावश्यक सामान ठेवून देतो. पण तुम्हाला माहितीये का? याचा आपल्या घरावर नकारात्मक परिणाम होतो. जर तुमच्या घरात सतत अस्वस्थपणा जाणवत असेल किंवा सतत आजारपण येत असेल तर यामागे कपाटावर ठेवलेले हे सामान कारणीभूत असू शकते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अजित पवार यांच्या जागी आमदार कोण? बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कधी लागणार? तयारी सुरु
याबाबतीत वास्तूशास्त्र काय सांगते?
वास्तू शास्त्रानुसार ही सवय घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम करते आणि हळूहळू यातून अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. कपाटाचा वरचा भाग जड आणि अस्ताव्यस्त झाल्याने घरातील वातावरण त्रासदायक बनते. घरात राहणाऱ्या व्यक्तींना अनेकदा अस्वस्थता, तणाव आणि निर्णय घेताना गोंधळ जाणवतो. याचा परिणाम केवळ मानसिक स्तरावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही होतो. अशा घरांमध्ये छोटी-मोठी आजारपणे सतत मागे लागलेली असतात. तसेच घराच्या प्रमुखासह सर्व सदस्यांच्या दिनचर्येवरही याचा परिणाम होतो.
घरात पैसा टिकत नाही
यातून एक महत्त्वाची समस्या निर्माण होते. ज्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. घरात येणाऱ्या पैशावर याचा मोठा परिणाम होतो. घरात पैसे तर येतात, पण ते टिकत नाहीत आणि अनावश्यक खर्च वाढतात. वास्तू शास्त्रात सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी मातेची अशा घरांवर अवकृपा होते. ती अप्रसन्न होते. यामुळे घराची समृद्धी मंदावते. मात्र यावर वास्तू शास्त्रामध्ये उपायही सांगितला आहे. चला तर, त्या उपायाविषयी जाणून घेऊया.
हे ही वाचा :
वास्तू शास्त्रानुसार उपाय काय?
हा दोष सुधारणं तसं तुलनेनं सोपं आहे. सर्वात आधी कपाटाच्या वरच्या भागातून सर्व अनावश्यक आणि जुन्या वस्तू काढून टाका. ज्या गोष्टींचा आता वापर होत नाही, त्यांना घरात ठेवू नका किंवा एखाद्या व्यवस्थित जागी ठेवा. यानंतर कपाटावर केवळ हलक्या आणि उपयोगात येणाऱ्या गोष्टीच ठेवा. तुम्ही तिथे छोटी रोपे ठेवू शकता, तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवू शकता किंवा सौम्य सुवासासाठी अगरबत्ती, सुगंधी कापडाचा वापर करू शकता. अशा प्रकारे कपाटाचा वरचा भाग स्वच्छ, हलका आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला राहील.
'ही' गोष्ट कायम लक्षात ठेवा
कपाटावरील हलकेपणा आणि व्यवस्था हा केवळ सजावटीचा विषय नाही; तर घरात मानसिक शांतता, सुख, समृद्धी आणि ऊर्जेचा समतोल राखण्याचा तो एक मार्ग आहे. जेव्हा तुम्ही नियमितपणे हे स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवता, तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि घरातील सदस्यांची मानसिक स्थिती स्थिर राहते व उत्साह जाणवतो. यामुळे जीवनातील छोट्या-मोठ्या अडचणी कमी होतात.
ADVERTISEMENT











