स्वरसम्राज्ञी आशाताई अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, उपस्थितांना अश्रू अनावर

मुंबई तक

• 06:14 PM • 13 Apr 2026

Asha Bosale Passed Away : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज 13 एप्रिल 2026 रोजी शासकीय इतमामाने शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूडसह राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.

Asha Bosale Passed Away

Asha Bosale Passed Away

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आशा भोसलेंना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडसह राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली

point

20 हून अधिक भारतीय भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी गायली

Asha Bosale Passed Away : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या निधनानंतर संगीत विश्वात शोककळा पसरली. बॉलिवूडसह दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अशातच त्यांच्यावर शासकीय इतमामाने आज 13 एप्रिल रोजी शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुण्यात PhD चे शिक्षण घेणाऱ्या 30 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये छेडछाडीचा आरोप अन् भयंकर...

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

त्यांच्या निधनाने भारतातील संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आशा भोसलेंना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडसह राजकीय नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 

आशा भोसलेंना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडसह राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली

तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. मंगलप्रभात लोढा, भैय्याजी जोशी, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, राज्यपाल जिष्णु देव शर्मा आणि विश्वास नांगरे पाटील यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. 

दरम्यान बॉलिवूड अभिनेता अमिर खान, अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री आशा पारेख, रितेश देशमुख, राकेश रोशन, नीना गुप्ता,विकी कौशल, अनु मलिक यांच्यासह काही कलाकारांनी पार्थिवाचं दर्शन घेतलं होतं, नंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. 

20 हून अधिक भारतीय भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी गायली

आशा भोसले यांनी मराठी आणि हिंदीच नव्हे तर 20 हून अधिक भारतीय भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी गायली. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, गझल, लावणी आणि पॉप संगीत अशा सर्वच प्रकारांत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासासाठी त्यांना भारत सरकारकडून 'पद्मविभूषण' आणि चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हे ही वाचा : कल्याण-मुरबाड महामार्गावर भीषण अपघात, ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत 11 जणांचा दुर्दैवी अंत

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकारांसोबत केलं काम

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अजरामर गाणी गायली. त्यांच्या जाण्याने केवळ संगीत क्षेत्रच नाही,तर सर्वच स्तरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे.