Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा तडाखा अधिक जाणवू लागला आहे. काही जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा हाय अलर्ट जारी केला आहे. त्यापैकी रायगड आणि ठाणे या 2 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आलं आहे. राज्यातील बहुतेक भागांमध्ये आकाश स्वच्छ राहणार असून उष्णतेचा पारा अधिक वाढणार असल्याचा हवामानाचा अंदाज जारी केलाय, अशातच 14 एप्रिल 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्यात PhD चे शिक्षण घेणाऱ्या 30 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये छेडछाडीचा आरोप अन् भयंकर...
कोकण
कोकण विभागात उष्णतेत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी भागात आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहील असा हवामान विभागाचा अंदाज जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा चटका अधिक जाणवणार आहे. तसेच या विभागात वातावरण कोरडं राहण्याची दाट शक्यता आहे. दुपारनंतर उन्हाची अधिक तीव्रता जाणवेल, अशातच नागरिकांनी उन्हापासून बचाव करावा.
मराठवाडा
मराठवाडा विभागात उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. या विभागातील वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर सूर्यदेव आग ओकणार असून हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट आहे.
हे ही वाचा : शिंदेंचा आमदार बिबट्यावर गेला धावून, स्टंटबाजी बेतली असती जीवावर.. कॅमेऱ्यात सगळंच झालं कैद! VIDEO
विदर्भ
विदर्भात उष्णतेचा अधिक प्रभाव जाणवत आहे. दुपारी उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची संभावना आहे, असा हवामान विभागने अलर्ट जारी केलाय.
ADVERTISEMENT











