Asha Bhosale Death : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
शिवाजी पार्क येथे होणार अंत्यसंस्कार
आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी असेही सांगितले की, त्यांच्यावर उद्या संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जातील. आनंद भोसले म्हणाले, 'माझ्या आईचे आज निधन झाले. लोक उद्या सकाळी 11 वाजता लोअर परळ येथील 'कासा ग्रांडे' येथे त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करू शकतात. त्यांच्यावर उद्या संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार केले जातील.'
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यात सूर्य आग ओकणार, काही ठिकाणी उष्णतेचा पारा वाढणार
12 हजारांहून अधिक गाण्यांचा रेकॉर्ड
आशा भोसले यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नव्हे, तर 20 हून अधिक भारतीय भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, गझल, लावणी आणि पॉप संगीत अशा सर्वच प्रकारांत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासासाठी त्यांना भारत सरकारकडून 'पद्मविभूषण' आणि चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हे ही वाचा : मोठी बातमी! ‘या’ मतदारसंघात ईव्हीएमचं री-काऊंटिंग होणार, जागेवर गेम फिरणार? कोर्टाचा निकाल काय?
अशी झाली गाण्याची सुरुवात
8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत त्यांचा जन्म झाला. गाण्याचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. त्यांनी 1943 मध्ये 'माझा बाळ' या मराठी चित्रपटातून पहिले गाणे गायले. मध्ये 'चुनरिया' चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्यांना कमी बजेटच्या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली, पण नंतर 'पेइंग गेस्ट' (1956) सारख्या चित्रपटांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले.
हे ही वाचा : Govt Jobs : B.Sc उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, मिळणार 60 हजार रुपये पगार; 'असा' करा अर्ज
वैयक्तिक आयुष्यातील चढउतार
संगीतकार आर.डी. बर्मन यांच्यासोबत त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली. 1981 मध्ये आलेल्या उमराव जान या सिनेमातील गझल गायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आशा भोसले यांनी वयाच्या 16 व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्याशी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले. मात्र लग्नानंतर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यानंतर त्यांनी 1960 मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर 1980 मध्ये त्यांनी संगीतकार आर.डी.बर्मन यांच्याशी दुसरे लग्न केले
ADVERTISEMENT











