Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यात सूर्य आग ओकणार, काही ठिकाणी उष्णतेचा पारा वाढणार

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात मध्यंतरी अवकाळी पावसाने हाहाकार माजला होता, मात्र आता राज्यात उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. अशातच राज्यातील हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याचा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे, जाणून घेऊयात 12 एप्रिल रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.

ADVERTISEMENT

maharashtra weather
maharashtra weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता

point

जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात मध्यंतरी अवकाळी पावसाने हाहाकार माजला होता, मात्र आता राज्यात उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. अशातच राज्यातील हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याचा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. तसेच 12 एप्रिल रोजी राज्यातील वातावरणाचा एकूण अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद केला आहे, जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज...

हे ही वाचा : शिंदेंच्या मुलाखतीचा उल्लेख, बाळासाहेबांची व्यंगचित्रे, कुणाल कामरा हक्कभंग समितीला दिलेल्या उत्तरात काय म्हणाला?

कोकण 

कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. समुद्रकिनारी आद्रतेचे प्रमाण अधिक असल्याने उकाड्यात अधिकची वाढ होण्याची शक्यता जारी केलीये. तसेच काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे, पण पावसाचा कोणाताही अंदाज जारी केलेला नाही. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा कायम राहणार असून काही ठिकाणी हलके वारे वाहणार असल्याची शक्यता आहे. मात्र, तपमानात वाढ कायम राहणार असल्याची हवामान विभागाने शक्यता जारी केली. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात हवामान विभागाने कोरडं आणि उष्ण हवामानाचा इशारा दिला आहे. सूर्याच्या प्रकाश अधिक तीव्र झाल्याने उष्णतेचा तडाखा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.