Govt Jobs : B.Sc उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, मिळणार 60 हजार रुपये पगार; 'असा' करा अर्ज
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. बीएससी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची ही उत्तम संधी आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
B.Sc उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी
मिळणार 60 हजार रुपये पगार
'असा' करा अर्ज
Govt Jobs : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या 'राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड' (RCF) मार्फत रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आरसीएफने 'ऑपरेटर (केमिकल) ट्रेनी' या पदासाठी एकूण 188 जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती प्रामुख्याने मुंबई येथील प्रकल्पासाठी असून, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार किमान 55% गुणांसह B.Sc. (Chemistry) उत्तीर्ण असावा आणि सोबतीला NCVT (AO-CP) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय, केमिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारही या भरतीसाठी पात्र ठरू शकतात. अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी गुणांच्या टक्केवारीत 5% शिथिलता देण्यात आली असून, त्यांच्यासाठी 50% गुणांची अट ठेवण्यात आली आहे.
हे ही वाचा : शिंदेंच्या मुलाखतीचा उल्लेख, बाळासाहेबांची व्यंगचित्रे, कुणाल कामरा हक्कभंग समितीला दिलेल्या उत्तरात काय म्हणाला?
वयोमर्यादा, अर्जाचे शुल्क आणि पगार
वयोमर्यादेचा विचार करता, 1 फेब्रुवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 30 वर्षांपर्यंत असावे. सरकारी नियमानुसार, मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये सवलत लागू असेल, ज्यामध्ये SC/ST प्रवर्गाला 5 वर्षे तर OBC प्रवर्गाला 3 वर्षांची सूट दिली जाईल. अर्जासाठी सामान्य (General), EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 700 रुपये शुल्क भरावे लागेल. विशेष म्हणजे, SC/ST, PWD, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. या पदासाठी सहा महिन्यांच्या ट्रेनिंगच्या काळात 22 हजार रुपये इतके मानधन दिले जाईल. हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर 60 हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल.
हे ही वाचा : मोठी बातमी! ‘या’ मतदारसंघात ईव्हीएमचं री-काऊंटिंग होणार, जागेवर गेम फिरणार? कोर्टाचा निकाल काय?
अर्जाची शेवटची तारीख
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2026 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) आहे. शेवटच्या क्षणी होणारी तांत्रिक अडचण टाळण्यासाठी उमेदवारांनी मुदतीपूर्वीच आपले अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आरसीएफच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.rcfltd.com) भेट द्यावी.









