अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये सर्वांना हादरंवून टाकलं आहे. रोज कोणता ना कोणता नवीन निर्णय किंवा नवी धमकी. रशियाने 50 दिवसात यूक्रेनसोबतचं युद्ध संपवलं नाही, तर दुय्यम शुल्क लावलं जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. जे देश रशियासोबत व्यापार करतील, त्यांच्यावर अमेरिकेकडून 100 टक्के शुल्क लावलं जाईल. भारत आता रशियाकडून आवश्यकतेप्रमाणे 35-40 % कच्च्या तेलाची खरेदी करतो. ट्रम्प यांच्या धमकीमुळे हे थांबलं, तर पेट्रोल-डिझेल प्रति लिटरमागे 8-12 रुपयांनी महागू शकतं.
ADVERTISEMENT
ट्रम्प यांनी काय म्हटलं आहे? हे आधी समजून घ्या. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ते जगातील वादविवाद थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, यूक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवण्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यांनी सर्वात आधी यूक्रेनच्या राष्ट्रपतींचं व्हाईट हाऊसमध्ये अपमान केलं आणि त्यांना मदत करायचं थांबवलं.
मण, रशियामुळेच हे युद्ध सुरु आहे, हे त्यांना लवकरच कळलं. त्यांनी 14 जुलै रोजी धमकी दिली होती की, 50 दिवसांच्या आत रशियाने युद्ध थांबवलं नाही, तर ते दुय्यम शुल्क लावतील. ही डेडलाईन 2 सप्टेंबरला संपेल. रशियाने ट्रम्प यांच्या धमकीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीय. तसच हा विषय त्यांनी गांभीर्याने घेतला नाहीय.
तुम्हाला आठवतच असेल की, रशियाने 2022 मध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. त्यामुळे अमेरिका आणि युरोपीय देशांनी आर्थिक निर्बंध लावले होते. त्यांना वाटलं होतं की, रशियावर दबाव येईल. पण झालं उलटंच..रशियाने भारत आणि चीन सारख्या देशांसोबत व्यापार वाढवला. भारत 2022 च्या आधी 100 पैकी 2 बॅरेल कच्चं तेल रशियाकडून खरेदी करत होता.
आता त्याचं प्रमाण वाढून 35-40 बॅरलपर्यंत पोहोचलं आहे. भारताला सुरुवातीच्या काळात रशियाचं तेल इतर देशांच्या तुलनेत प्रति बॅरल 10-12 डॉलर स्वस्त पडतं होतं. आता हा फरक 3-4 डॉलरपर्यंत आला आहे. रशियाकडून स्वस्त तेल मिळत असल्याने युद्धाचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पडला नाही. महागाई आटोक्यात राहिली.
भारत फक्त रशियाच्या कच्च्या तेलावर अवलंबून नाहीय. 35-40 देशांकडून कच्चं तेल खरेदी केलं जातं. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलंय की, अमेरिकेनं दुय्यम शुल्क लावलं तर, कच्च्या तेलाचे भाव 140 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचू शकतात. त्यांचं म्हणणं आहे की, रशिया जगाच्या गरजेपेक्षा 10 टक्के उत्पादन करतं. हे तेल बाजारात आलं नाही, तर महागाई वाढेल.
रशियाकडून स्वस्त तेलाच्या खरेदीवरून अमेरिकेशी पंगा घ्यायला, भारताला आवडणार नाही. भारत दुसऱ्या देशांकडूनच तेल खरेदी करेल. रशियाकडून भारताला कच्च तेलं दिलं जाणार नाही आणि कच्च्या तेलाचे भाव 140 डॉलर प्रति बॅरल होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे प्रट्रोल-डिझेलच्या किंमती प्रति लीटर 8-12 रुपयांनी वाढू शकतात. एकंदरीतच अमेरिकेची ट्रेड डील फसली होती, आता हे नवी डोकेदुखी सुरु झालीय.
ADVERTISEMENT
