अहिल्यानगरच्या देवव्रत महेश रेखे या अवघ्या 19 वर्षांच्या तरुण वेदमूर्तीने 50 दिवस दोन हजार वेदमंत्रांचे अखंड म्हणजे 'दंडक्रम पारायण' करून अभूतपूर्व कामगिरी केल्याची बातमी समोर आली आहे. महेश रेखेच्या या कामगिरीमुळे संपूर्ण आध्यात्मिक जगतालाच प्रेरणा मिळाली आणि इंटरनेट तसेच सोशल मीडियावर सुद्धा याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहे. 200 वर्षांत हा विक्रम नोंदवणारा महेश भारताचा दुसराच आणि सर्वांत तरुण वेदमूर्ती ठरला आहे. वाराणसी येथे काशी तमिळ संगम 4.0 च्या उद्घाटन समारंभात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या तरुण वेदमूर्ती सन्मान केला आणि त्याला आध्यात्मिक जगतासाठी प्रेरणेचा एक नवीन किरण म्हटलं.
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदींकडून कौतुक
तसेच, महेशचं कौतुक करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, "19 वर्षीय देवव्रत महेश रेखे यांच्या कामगिरीबद्दल जाणून खूप आनंद झाला. त्याचं हे यश भावी पिढ्यांना खरंच प्रेरणादायी आहे. भारतीय संस्कृतीवर श्रद्धा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे जाणून आनंद होईल की श्री देवव्रत यांनी शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेच्या 2000 मंत्रांचा समावेश असलेला 'दंडकर्म पारायण' 50 दिवस कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण केला आहे. त्यात असंख्य वैदिक स्तोत्रे आणि पवित्र शब्द आहेत, जे त्याने अचूकतेने उच्चारले."
हे ही वाचा: मुंबईची खबर: दादर-CSMT स्टेशनवरील गर्दी कमी होणार! मुंबईतील स्थानकांवर उभारणार 20 नवे प्लॅटफॉर्म्स... प्रशासनाचा मोठा निर्णय
'दंडक्रम पारायण' म्हणजे काय?
शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेचे 2000 मंत्र 50 दिवसांत कोणताही खंड न पाडता म्हणणे याला 'दंडक्रम पारायण' असे म्हणतात. हे सर्व मंत्र मुखोद्गत म्हणायचे असतात. त्यातही उलट-सूलट आणि सलग क्रमाने ते विशिष्ट स्वरात व्याकरण, छंद आणि अचूक उच्चारांसह म्हणावे लागतात. देवव्रतने दंडक्रम पारायणम् 50 दिवसांत पूर्ण करून 200 वर्षांत प्रथमच हा विक्रम महाराष्ट्राच्या नावे नोंदवला.
हे ही वाचा: आहिल्यानगर : 3 लाख घेऊन लग्नाची नोटरी, पण कोर्टात विवाह उरकून घरी परतताना नवरी पळून गेली
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय म्हणाले?
महेश देवव्रत याने हे पठण 50 दिवस सातत्याने आणि अखंडपणे पूर्ण केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, "ही कामगिरी आपल्या प्राचीन गुरु परंपरेच्या वैभवाचे पुनरुज्जीवन करण्यासारखी आहे. पवित्र काशीच्या दिव्य भूमीवर हा वैदिक विधी यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि ही अतिशय अभिमानाची बाब आहे. देवव्रत यांचे कुटुंब, आचार्य, संत, ऋषी आणि ज्या संस्थांनी या तपश्चर्या यशस्वी होण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन."
ADVERTISEMENT











