crime news : हैदराबादमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. एका चार वर्षांच्या नर्सरीत शिक्षण घेणाऱ्या चिमुरडीला एका महिला मदतीनीसने बेदम मारहाण केली होती. ही घटना हैदराबादमधील जीदीमेटला येथील शापूरनगरातील एका खासगी शाळेत शनिवारी घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दारू पार्टीत मोठा वाद, मित्राच्या बायकोच्या डोक्यात विटेनं हल्ला करत संपवलं, रात्री धक्कादायक कांड
विद्यार्थिनीला बाथरूममध्ये नेलं आणि जमिनीवर आपटलं
मिळालेल्या एकूण माहितीनुसार, मुलीची आई त्याच शाळेत बस कंडक्टर म्हणून कार्यरत होती. शाळा सुटल्यानंतर ती विद्यार्थ्यांना सोडून गेली असता, तिथे तीन-चार वर्षांची विद्यार्थिनी शाळेच्या कॅम्पसमध्येच होती. मदतनीस लक्ष्मीनं लहान मुलीला वॉशरुममध्ये नेलं आणि तिच्यावर क्रूरपणे हल्ला केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आरोपी महिला आणि विद्यार्थिनीला वारंवार बेदम मारहाण करण्यात आली, एवढंच नाहीतर जमिनीवर आपटण्यात आले.
तिचा गळा दाबला
आरोपीने चिमुरीडीचे डोकं आपटलं, नंतर तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा थरार व्हिडिओत कैद करण्यात आला आला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. आरोपी लक्ष्मी आणि मारहाण केलेल्या विद्यार्थिनीच्या आईमध्ये जूना वाद होता. आरोपी लक्ष्मीला नोकरीचा तणाव निर्माण झाला होता, यामुळे तिला अनेकदा अस्वस्थ देखील वाटायचे, याच तणावातून तिने विद्यार्थिनीवर हल्ला करत सर्व राग काढला.
हे ही वाचा : मुंबईची खबर: दादर-CSMT स्टेशनवरील गर्दी कमी होणार! मुंबईतील स्थानकांवर उभारणार 20 नवे प्लॅटफॉर्म्स... प्रशासनाचा मोठा निर्णय
विद्यार्थिनीवर वैद्यकीय तपासणी सुरु
या एकूण क्रूरतेचं कृत्य शेजाऱ्याने कॅमेऱ्यात कैद केलं. त्या व्हिडिओच्या आधारे, मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि नंतर तिला ताब्यात घेतलं. ही घटना व्यक्तिगत द्वेषातूनच घडली आहे. सध्या विद्यार्थिनीवर वैद्यकीय तपासणी सुरु करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











