दारू पार्टीत मोठा वाद, मित्राच्या बायकोच्या डोक्यात विटेनं हल्ला करत संपवलं, रात्री धक्कादायक कांड

मुंबई तक

crime news : सोमवारी रात्री उशिरा दोन व्यक्तीनी एका महिलेवर विटेने हल्ला केला. विटेनं हल्ला करणारे व्यक्ती हे महिलेच्या पतीचेच मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मित्राच्या पत्नीवर विटेने हल्ला 

point

दारूच्या पार्टीदरम्यान धक्कादायक घटना 

Crime News : बिहारच्या पाटण्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. दोन आरोपींनी मित्राच्या पत्नीच्या डोक्यात विट आणि दगडाने हल्ला करत संपवलं. गुन्हा करण्यापूर्वी हल्लेखोरांची ओळख पटू नये म्हणून त्यांनी दिवे घालवून अंधार करत हे कांड केलं. ही घटना रात्री 8: 15 वाजताच्यासुमारास घडली. 

हे ही वाचा : आई बाथरूममध्ये गेली, बाहेर येईपर्यंत भावानेच 'त्या' कारणावरून बहिणीचा गळा चिरला

मित्राच्या पत्नीवर विटेने हल्ला 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघनाथ शहा यांची पत्नी प्रियंका (वय 25) हिची हत्या करण्यात आली. हल्लेखोर दुसरे तिसरे कोणीही नसून तिच्या पतीचे मित्र होते. प्रकाश उर्फ ​​जेपी आणि लालू उर्फ ​​मुखिया अशी त्यांची नावे आहेत. दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी छापे देखील टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. 

दारूच्या पार्टीदरम्यान धक्कादायक घटना 

वृ्त्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, समस्तीपूरमधील जंदाहा येथील रहिवासी असलेले मेघनाथ शहा वर्षभरापासून पटना येथील राजीव नगर येथे राहतात. त्यांना सात वर्षांचा मुलगा देखील आहे. घटनेच्या वेळी प्रियांकाचा पती मेघनाथ मित्रांसोबत दारूची पार्टी करत होता. त्यांच्यात काही कारणावरून वाद निर्माण झाला होता.

सुरुवातीला त्यांच्यात शिवीगाळ झाली आणि त्यांच्यात वाद झाला. नंतर वादाचे रुपांतर हे मारहाणीत झाले. याच वादाचा राग अनावर न झाल्याने मेघनाथ शहाची पत्नी प्रियांकाची हत्या करण्यात आली. तेव्हा मेघनाथच्या मित्रांनीच प्रियांकावर विटेने हल्ला केला. या गंभीर हल्ल्यात प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं पाटना शहर हादरून गेले आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp